Last Updated on 10 Jul 2023 4:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । नवेखेड (ता.वाळवा) येथील माऊली दूध संस्थेचे संस्थापक,वाळवा तालुका राष्ट्रीय साखर प्रतिनिधी मंडळाचे माजी सरचिटणीस शामराव यशवंत पवार (वय66 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखान्यात टायपिस्ट म्हणून प्रदिर्घ सेवा केली आहे.ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे महिन्याचे वारकरी होते.त्यांच्या पश्चात पत्नी,विवाहित दोन मुलगे, एक मुलगी,भाऊ,भावजयी,पुतणे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन मंगळवार दि.11 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता नवेखेड येथे होणार आहे.
नाबार्ड बँक,शाखा कोल्हापूरचे अधिकारी सचिन पवार,फलटणच्या शरयू शुगरचे सिनियर केमिस्ट शरद पवार यांचे ते वडील होत.







































































