Last Updated on 13 Sep 2022 10:41 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सध्याचा जमाना हा डिजीटलचा आहे, त्यामुळे सध्या लोकं फोन,टॅब किंवा कंप्युटर / लॅपलॉपवरती बातम्या आणि माहिती मिळवतात.परंतु तरी देखील अशी अनेक लोकं आहेत जे बातम्यांचं ट्रेडिश्नल माध्यम म्हणजे वर्तमानपत्र वापरतात.काही लोकांचा वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवस देखील जात नाही. या वर्तमानपत्रात तुम्ही एक गोष्ट नक्कीच पाहिली असेल, ती म्हणजे त्याच्या तळाशी असलेले चार रंगीत ठिपके.परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की असं का केलं जातं? हे दररोज का छापले जाते आणि विशेष म्हणजे दररोज हे ठिपके एकाच रंगाचे असतात?
अनेक वेळा आपल्यासमोर अशा गोष्टी येतात.त्याची उत्तर आपल्याला माहिती नसतात. किंबहूना ते प्रश्न मनात तसेच राहून जातात.त्यामुळे मनात सतत ‘हे असं का असेल?’ या विचारात आपण राहतो. मात्र, त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळत नाही. आज आपण अशाच एका गोष्टी बाबत जाणून घेणार आहोत.देशभरात लाखो लोक दररोज वृत्तपत्र वाचतात, पण तुमच्या कधी हे लक्षात आलं आहे का, की वृत्तपत्राच्या तळाशी वेगवेगळ्या रंगाचे ठिपके का असतात? अनेकवेळा हा प्रश्नही तुमच्या मनात आला असेल. याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

का असतात हे ठिपके?
खरे तर वेगवेगळ्या रंगांचे हे चार ठिपके वर्तमानपत्राच्या छपाईबद्दल सांगतात, ज्याद्वारे वर्तमानपत्र छापले गेले आहे.ही एक विशेष प्रकारची छपाई आहे, ज्याला CMYK मुद्रण म्हणतात.या छपाईमध्ये चार रंग असतात.
वास्तविक,या विशिष्ट छपाईमध्ये निळसर (हलके आकाशी),गुलाबी, पिवळा आणि काळा रंग आहे. CMYK प्रिंटिंगमधील चार गोष्टींचे हे चार ठिपके प्रतिनिधित्व करतात, ज्यात निळसर, गुलाबी, पिवळा आणि काळा यांचा समावेश होतो.या रंगाच्या समुहाला CMYK म्हणतात. CMYK ला रजिस्ट्रेशन मार्क देखील म्हटले जाते.
जेव्हा वृत्तपत्राची छपाई सुरु असते. तेव्हा प्रिन्ट काढणारा व्यक्ती हे डॉट पाहतो. जर हे डॉट ठीक येत नसतील तर वृत्तपत्रात छापले जाणारे फोटो देखील खराब येतात. त्यामुळे छपाई करणारा व्यक्ती वृत्तपत्राच्या तळाशी असलेले हे चार डॉट पाहत असतो.थोडक्यात वृत्तपत्रावरील हे ठिपके वृत्तपत्रावर योग्य कलर पॅटर्न बनवण्यासाठी डॉट मार्कर म्हणून काम करतात.
अनेक वृत्तपत्रात या CMYK रंगाच्या सेड देखील वापरलेल्या असतात. मात्र, ज्या वृत्तपत्रामधील हे डॉट ठीक आलेले नसतात. त्या वृत्तपत्राची छपाई ठीक झाली नाही. असं समजले जाते.
कधी कधी आपल्या वृत्तपत्रातील फोटो खराब दिसतात.अशा वेळी आपण फोटो खराब असल्याचा अंदाज लावतो.मात्र, अनेक वेळा वृत्तपत्रातील फोटो खराब नसतो तर प्रिन्टर खराब असल्याने छपाई व्यवस्थित झालेली नसते. अशा वेळी तुम्हाला जर फोटो खराब आहे की प्रिन्ट खराब आहे.हे जाणून घ्यायचे असेल तर हे ठिपके आवश्य पाहा.
थोडक्यात रंगाचे ठिपके जर प्रिन्टमध्ये इकडे – तिकडे झाले असतील.किंवा दुसरा रंग कोणत्याही रंगामध्ये विखुरला गेला असेल तर वृत्तपत्राची प्रिन्ट खराब असते.त्यामुळे प्रिन्ट काढणारा व्यक्ती वृत्तपत्रातील हे ठिपके पाहत असतो.प्रिन्टमध्ये हे ठिपके ठीक नसतील तर तो प्रिन्टरचे टोनर ठीक करुन पुन्हा प्रिन्ट काढून पाहतो.हे चार ठिपके ठीक असतील तर तो प्रिन्ट काढतो.












































































