Last Updated on 11 Jul 2023 4:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली
नवी दिल्ली | महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास उठवली आहे.त्यामुळे महायुती सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.याचिकाकर्ते रतन सोहली यांनी याचिका मागे घेतल्याने ही स्थगिती उठली असून राज्यपालांना आमदार नियुक्त करायचे असेल तर करू शकतात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचे नियुक्ती प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे अद्यापपर्यंत आमदारांची नियुक्ती करण्यात आली नव्हती.महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे दिली होती.मात्र,त्यांनी त्यावर कुठलाही निर्णय दिलेला नव्हता.
त्यांनतर शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर त्यांनी नवी यादी राज्यपालांकडे दिली होती.त्याविरोधात याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी कायम ठेवावी अशी मागणी केली होती.या प्रकरणावर आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी पार पडली.







































































