Last Updated on 20 Jun 2023 7:43 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । विदर्भासह देशाच्या पूर्व भागात पुढच्या 3 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.ओदिशा, बिहार, झारखंड, छत्तीसगढ़ आणि पूर्व उत्तरप्रदेशातील काही भागात काल 42 ते 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस होतं. येत्या 2 दिवसात पूर्व आणि दक्षिण भारतात कमाल तापमानात बदल होणार नाही. मध्य प्रदेशात पुढचे ५ दिवस कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार मादक काही भागात पुढच्या 2-3 दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.












































































