Last Updated on 19 Nov 2022 7:46 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा येथील श्रीमती सुजाता शामराव पाटील (६५ वर्षे) यांचे जटा निर्मूलन करण्यात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे.
श्रीमती सुजाता पाटील यांच्या गेल्या तीन चार वर्षापासून जटा वाढल्या होत्या.अज्ञान,अंधश्रध्दा आणि आरोग्य अनास्था यामुळे जटा वाढल्या जातात.महा. अं नि स कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यावर या कुटुंबाचे,श्रीमती पाटील यांचे प्रबोधन केले, जटा निर्मूलन करण्यास तयार झाले.महा.अं नि स चे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे,अंधश्रध्दा निर्मूलन पत्रिकेचे संपादक प्रा.नितीन शिंदे,प्रा.सतीश चौगुले,प्रा.रामभाऊ घुले,राजेंद्र मोटे यांनी हे जटा निर्मूलन केले. या जटा निर्मूलनसाठी लालासाहेब महादेव पाटील,सुरेश शामराव पाटील,सौ.पूनम सुरेश पाटील,योगेश मोटे यांचे सहकार्य लाभले.
वाळवा पंचायत समितीचे उपसभापती नेताजी पाटील यांनी श्रीमती सुजाता पाटील यांचा गौरव केला.यावेळी अभिजित भिलवडे,अरुण पाटील उपस्थित होते.”महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने संपूर्ण राज्यभर सातत्याने पाठपुरावा करून जटा निर्मूलनचे काम केले आहे.मानसिक गुलामगिरीतून,अंधश्रद्धेतून जटा वाढविल्या जातात.जटाधारी व्यक्तीचे खूप मोठे नुकसान होते,नियमित कामेही करता येत नाहीत.त्यामुळे आपल्या परिसरातील जटाधारी व्यक्तीची माहिती समितीला द्यावी असे आवाहन संजय बनसोडे यांनी केले आहे.










































































