Last Updated on 30 Nov 2023 12:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा येथील सौ.शांताबाई दिनकर माळी (वय 62 वर्षे) यांचे जटा निर्मूलन करण्यास आज (गुरुवारी) महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे.
सौ. माळी यांच्या डोक्यात गेली आठ-दहा वर्षापासून जटा तयार झाल्या होत्या.अंधश्रद्धेतून ,अज्ञानातून त्यांच्या या जटा राहिल्या होत्या.जटा असल्याने त्यांना खूप त्रास होत होता.जटा काढल्यावर देवाचा कोप होईल,अनेक संकटे येतील या भीती पोटी त्या जटा काढण्यास तयार नव्हत्या. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तसेच गावातील लालासाहेब महादेव पाटील यांनी त्यांचे प्रबोधन केले.त्यामुळे त्या जटा निर्मूलन करण्यास तयार झाल्या.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे,अंधश्रध्दा निर्मूलन पत्रिकेचे संपादक प्रा. डॉ.नितीन शिंदे,प्राचार्य डॉ. सुदाम माने,प्रा.सतीश चौगुले यांनी जटा निर्मूलन केले.यावेळी आशा वर्कर विजया माळी,सारिका माळी,मनीषा माळी, विलास माळी उपस्थित होते.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने गेल्या 34 वर्षात हजारो व्यक्तींचे जटा निर्मूलन केलेले आहे.जटाधारी व्यक्तीची माहिती संघटनेला कळवावी, सदर व्यक्तीचे प्रबोधन करून त्यांचे जटा निर्मूलन केले जाईल,असे आवाहन समितीने केले आहे,अधिक माहितीसाठी 9850899713 या क्रमांकावर संपर्क करावा.












































































