Last Updated on 17 Jun 2025 6:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उद्योग मंत्री उदय सामंत यांचे निर्देश
मुंबई | सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथे प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राच्या स्थापनेसाठी या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्थापन करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना जागेचा सर्वे करण्याचे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.
सांगली जिल्ह्यातील वाळवा- आष्टा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्राबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सुहास बाबर, आनंदराव पवार, गौरव नायकवडी आदी लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एमआयडीसीकरिता जागा अंतिम झाल्यानंतर त्या जागेचा कालमर्यादेत विकास करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. एमआयडीसीच्या स्थापनेमुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, वाळवा तालुक्यातील औद्योगिक विकासाला नवे आयाम मिळणार असल्याचे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 04 Mar 2026 5:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई -पुण्याच्या पलीकडे..! मुंबई । मुंबई-पुणे महामार्गाची ‘राणी’... Read more













































































