Last Updated on 08 Oct 2023 10:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
चेन्नई । विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारताने दणदणीत पराभव केला.ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 200 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने 4 विकेट देत 41.2 षटकात हे पूर्ण केले.या सामन्यात तीन खेळाडून लवकर बादल झाल्यानंतर के.एल राहुल व विराट कोहली जोडीने मोठी भागीदारी करुन डाव सावरला.या सामन्यात विराट कोहली 85 धावा केल्या.या खेळीत 6 चौकार लगावले. तर राहुलने 115 चेंडूमध्ये 8 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 97 धावांची नाबाद खेळी केली.
केएल राहुल आणि विराट कोहली हे दोघे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.तसेच ऑस्ट्रेलियाचा1992 नंतर पहिल्यांदाच वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यात पराभव झाला.
वनडे विश्वचषक 2023 मधील पाचवा सामना यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 199 धावांवर संपवला. त्यानंतर भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. 3 बाद 2 अशा स्थितीतून विराट कोहली व केएल राहुल यांनी डाव सावरला.दोघांनी 165 धावांची भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या दिशेने नेले त्यानंतर राहुल व हार्दिक पंड्या यांनी भारतीय संघाच्या विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.यासह भारताने सहा गडी राखून विजय मिळवत स्पर्धेत शानदार सुरुवात केली.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला.पण,भारताच्या फिरकी त्रिकुटापुढे ऑस्ट्रेलियाची भंबेरी उडाली.निर्धारित 49.3 षटकात ऑस्ट्रेलियाने 199 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूला अर्धशतक ठोकता आले नाही.तर 9 फलंदाज 30 धावसंख्या ओलांडू शकले नाहीत.ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांनी संघर्ष केला,पण मोठी खेळी करता आली नाही.स्मिथने 46 तर वॉर्नरने 41 धावांची खेळी केली.भारताच्या फिरकी त्रिकुटाने 30 षटकात फक्त 104 धावा खर्च केल्या.अश्विन, कुलदीप आणि रविंद्र जाडेजा यांनी एकूण सहा विकेट घेतल्या.रविंद्र जाडेजाने तीन गडी बाद केले.तर कुलदीपने दोन गडी बाद केले.
भारताचा पुढील सामना अफगाणिस्तानसोबत 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
भारत संघ | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.







































































