Last Updated on 27 Mar 2024 5:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गैरप्रकार, चुकीचा आर्थिक व्यवहार होऊ नये यासाठी सहकारी बँका, पतसंस्था व कारखान्यांनी दक्ष रहावे – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली । निवडणूक कालावधीमध्ये कोणताही गैरप्रकार तसेच कोणताही चुकीचा आर्थिक व्यवहार होऊ नये यासाठी सहकारी बँका, पतसंस्था त्याचबरोबर साखर कारखाने यांनी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्यरत राहावे,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील सहकारी बँका, पतसंस्था व साखर कारखान्याच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी म्हणाले,जिल्ह्यातील बँकांनी व पतसंस्थांनी आचारसंहिता काळात बँकेची रोकड वाहतूक करताना काळजी घ्यावी.तसेच साखर कारखाने त्यांच्या डिस्टलरी युनिट मधून तयार होणाऱ्या मद्यावर उत्पादन शुल्क व पोलीस विभागांनी एकत्रित लक्ष ठेवावे.जिल्ह्यात या विभागांने मतदार नाव नोंदणी मोहीम राबवावी तसेच आचारसंहितेला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केली.
तर साखर कारखान्यांनी त्यांच्या मद्य साठ्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत ठेवावा,अशी सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील,जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण,जिल्हा अधिक्षक उत्पादन शुल्क प्रवीण पोटे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती शिंदे,अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ यांच्यासह बँकाचे व साखर कारखान्याचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









































































