Last Updated on 26 Apr 2024 10:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात आज 26 एप्रिल 2024 रोजी 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधल्या 88 संसदीय मतदारसंघांमध्ये मतदान झाले.लोकशाहीची सर्वसमावेशकतेची भावना अधोरेखित करत मतदानाच्या दिवशी सर्व स्तरातल्या नागरिकांचा सहभाग दिसून आला.
आपला लोकशाही हक्क प्रथमच बजावण्याची उत्सुकता बाळगणाऱ्या नवमतदारांपासून ते महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग अशा सर्वच घटकांचे प्रतिबिंब मतदानात उमटले आहे.मतदारांचा सामूहिक आवाज आणि आकांक्षा टिपणारी मतदानाच्या दिवशीची ही छायाचित्रे सर्वसमावेशक लोकशाहीचे सार दर्शवतात.





























































































