Last Updated on 19 Dec 2024 5:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
प्रतीक्षा संपली! अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार
नागपूर । राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी दिला जाणार याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. अधिवेशन संपल्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर आम्ही जमा करणार आहोत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते मिळाले आहेत. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील, असं म्हटलं. राज्य सरकारनं योजना सुरु करताना महिलांना दरमहा 1500 रुपये दिले होते. त्याप्रमाणेच डिसेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जातील.
देवेंद्र फडणवीस म्हणाले…
आज या निमित्तानं सभागृहाला आश्वस्त करु इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका, जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत.ज्या ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत, एकही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं. हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात टाकणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Oct 2026 9:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit आणखी चाळीस तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश, परीक्षा शुल्क सरसकट माफ होणार पिण्याचे पाणी, चाऱ्याची उपलब्धतेबाबत नियोजन; शेतकऱ्यांकडून वसूली... Read more








































































