Last Updated on 05 Nov 2023 6:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर : मालती कन्या महाविद्यालयामध्ये रानभाज्या पाककृती स्पर्धा
सांगली । इस्लामपूर येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर,पर्ल यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय कार्यक्रमांतर्गत गृहशास्त्र विभाग आयोजित रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे म्हणून रानभाज्या घटक पदार्थावरती ‘पाककृती स्पर्धा व मार्गदर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ.सुवर्णा माळी यांनी रानभाज्यांचे आरोग्यातील महत्त्व सांगताना म्हणाल्या,आघाडा,करटोली,पाथरी,अंबाडी,टाकळा,आळू ,दानवा या भाज्या कालबाह्य होत चालल्या असून यापासून लोह,कॅल्शियम ,जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात मिळते.त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या भाज्यांसाठी विशिष्ट जमीन,हवामान, पाणी यांची गरज नसून त्या शेतामध्ये उगवत असून केव्हाही आपल्याला मिळू शकतात. प्रत्येकाने याचा उपयोग आपल्या आहारात करणे आवश्यक आहे.

विद्यार्थिनींनी स्पर्धेसाठी आघाड्याचे पॅटीस, पाथरीची भाजी, आळूचे गरगटे, शेपूचे थेपले,पॅटीस, पकोडे, पौष्टिक आटू, आळूचे फतफते, पालक पराठे, मेथी पराठा असे विविध पदार्थ ठेवण्यात आले.
या स्पर्धेसाठी सौ. जयश्री पाटील आणि सौ. प्रगती पाटील यांनी परीक्षणाचे काम केले.स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तेजस्विनी माळी (बीए-3) द्वितीय क्रमांक वर्षा लोहार (बीए -3) व तृतीय क्रमांक राणी परीट ( बीए -1) ग्रुप ऑफ इस्लामपूर पर्लच्या पदाधिकारी सौ .वैशाली माळी, सौ. अपर्णा माळी, सौ .शिल्पा आवटे, प्रा. डॉ.राम घुले, डॉ. मेघा विजय पाटील ,डॉ.मेघा संजय पाटील, डॉ. वृषाली पाटील प्रो.शीला रत्नाकर,नॅक समन्वयक प्रो. स्नेहल हेगिष्टे तसेच महाविद्यालयातील इतर सर्व स्टाफ उपस्थित होता.
स्पर्धेचे संयोजन गृहशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. वर्षा पाटील आणि प्रा. डॉ. रंजना पवळ यांनी केले . कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.अंकुश बेलवटकर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.









































































