Last Updated on 22 Jan 2025 9:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दावोस । महाराष्ट्र सरकारचा आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये रिलायंस सोबत Rs 3.05 लाख कोटीचा सामंजस्य करार झाला आहे. या करारामध्ये विविध क्षेत्रात 3 लाख नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत X वर पोस्ट करत माहिती देताना अनंत अंबानी यांचेही आभार मानले आहेत. दरम्यान राज्य सरकारने आतापर्यंत 9,30,457 कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांसह 32 सामंजस्य करार केले आहेत.
दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेच्या दुसऱ्या दिवशी राज्यात आणखी ३ लाख ५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार झाला. रिलायन्स सोबत झालेल्या या करारातून ३ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यामुळं राज्यानं केलेल्या सामंजस्य करारांचं मूल्य ९ लाख ३० हजार कोटी रुपयांहून अधिक झालं आहे.
याशिवाय ह्युंदाई, डीपी वर्ल्ड, सिस्को, ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर, NTT DATA या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चर्चा केली. या कंपन्यांही राज्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 04 Mar 2026 4:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । केंद्र सरकारमार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्यास १३ कोटी लेबर बजेट मंजूर केले होते. त्यामध्ये वाढ करून केंद्राने... Read more















































































