Last Updated on 14 Jul 2023 10:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शिक्षक भरतीला मिळाला मुहूर्त,दोन टप्प्यांत होणार नियुक्त्या
पुणे । राज्यातील शिक्षक भरतीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.राज्यात शिक्षकांची 50 हजार पदे टप्प्याटप्प्याने भरण्याची कार्यवाही शासनस्तरावर सूरु आहे.राज्यातील जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमध्ये 50 हजार शिक्षकांची भरती होणार लवकरच केली जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज पुण्यात सांगितले.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रस्तावित शिक्षक भरतीबाबतची माहिती पुण्यात दिली.राज्यात शिक्षकांची 50 हजार पदे टप्प्याटप्प्याने भरण्याची कार्यवाही शासनस्तरावर सूरु आहे.यामध्ये पहिल्या टप्प्यात 30 हजार, तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे.ही भरती होईपर्यंतच निवृत्त शिक्षकांकडून काम करून घेतलं जाणार आहे.भरती प्रक्रियेला विलंब झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.
केसरकर म्हणाले,’आम्ही भरतीची प्रतिक्रिया सुरु केली होती.परंतु औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याने कोणतीच प्रक्रिया करता येत नव्हती’,’आता हायकोर्टाने त्यांची स्थगिती उठवली आहे त्यामुळे शिक्षक भरतीचे परिपत्रक (GR) आजच काढण्यात येणार आहे.’
शाळात विद्यार्थी किती असतात यावर नियंत्रण नसते.त्यामुळे सर्व शाळांवर आता कॅमेरे लावले जातील,असेही केसरकर म्हणाले.नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणासाठीही काम केले आहे.महाराष्ट्राचे मॉडेल देशात वापरले जात असल्याचे केसरकर यांनी सांगितले.












































































