Last Updated on 27 Nov 2024 9:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी सकाळी गारवा जाणवत आहे उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात काही जिल्ह्यात तापमानाचा पारा १० खाली घसरला. मुंबईत आज पहाटे अनेक ठिकाणी धुक्याची चादर दिसून आली. विदर्भाचा नंदनवन म्हणून ओळखला जाणारा चिखलदऱ्य़ात थंडी वाढली असून पारा ९ अंशावर पोहोचलाआहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आणि मेळघाटातील घनदाट जंगलात वसलेल्या चिखलदरात सकाळच्या वेळी धुकं होत यामुळे वातावरण .. अल्हादायक वातावरण झालं आहे . स्थानिक नागरिकांसह पर्यटक गारव्यापासून बचाव करण्यासाठी गरम कपडे आणि दिवसाही शेकोटीची मदत घेत आहेत पुढील पाच दिवस राज्यातलं हवामान कोरडं राहिल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानात किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं ९.४ दशांश अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं.
नाशिकमध्ये १०.६ दशांश अंश सेल्सियस तर निफाडमध्ये ८ पुर्णांक ४ दशांश अंश सेल्सियस तापमान आज नोंदवलं गेलं.
नवी दिल्लीतही हवामानाची गुणवत्ता खालवलेल्या स्थितीत कायम आहे. दिल्लीसह पश्चिम बंगालच्या काही जिल्ह्यांमध्ये दाट धुकं पसरलं होतं. तर तामिळनाडूत बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. उत्तरेत काश्मीरसह काही भागात बर्फवृष्टी होत आहे.









































































