Last Updated on 04 Nov 2022 6:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । राज्यातील सर्व नवपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपकामाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व सृजनशील विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी,शिक्षक,पालक यांच्या समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते.
त्यानुसार यावर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.
1) पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या सेविका व पर्यावेक्षिका.
2) प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक.
3) माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक.
4) विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती विषय सहाय्यक विषय साधन व्यक्ती समावेशित साधन व्यक्ती व ग्रंथपालगट.
5) अध्यापकाचार्य व पर्यावेक्षकीय अधिकारी केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022-23 चे आयोजन पाच गटात करण्यात आले आहे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी ,शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), कोल्हापूर चे प्राचार्य, डॉ.आय.सी.शेख यांनी केले आहे. नवोपक्रम दि. 20 नोव्हेंबर 2022 या पर्यंत SCERT पुणे यांच्याकडून देण्यात आलेल्या लिंकवर सादर करावे. सदरची लिंक जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे उपलब्ध करून देणेत आली आहे.
त्यानुसार आपल्या अधिनिस्त अधिकारी शिक्षक अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना
https://scertmaha.ac.in/innovation/
वरील लिंक वर दिनांक 2 नोव्हेंबर 2022 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आपले नव उपक्रम अहवाल सादर करण्याविषयी सूचित करण्यात यावे.वरील प्रमाणे दिनांक 20 नोव्हेंबर 2022 पर्यंत नवोपक्रम अहवाल सादर करायचे आहेत.











































































