Last Updated on 30 May 2025 8:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । उत्पादन वाढीत शुध्द बियाणे हा एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे आपण गेल्या २-३ वर्षापासून आपल्या साखर कारखान्या मार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस रोपे पुरवठा करीत आहोत. यावर्षी आपण राजारामबापू साखर कारखान्यामार्फत २५ लाख रोपे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधा वर पोच करणार आहोत,असा विश्वास राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.
प्रतीक पाटील यांनी तांबवे,धोत्रेवाडी, येवलेवाडी गावांचा संपर्क दौरा करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला,त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.माजी जि.प. अध्यक्ष,कारखान्याचे संचालक देवराज पाटील,अतुल पाटील,कृष्णेचे संचालक लिंबाजी पाटील,ब्रम्हानंद पाटील,डॉ.अशोक पाटील,राजारामबापू दूध संघाचे संचालक पोपट जगताप,विजयकुमार नलवडे, राजारामबापू बँकेचे माजी संचालक रामभाऊ माळी,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, सचिव डी.एम. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. या दौऱ्यात प्रतिकदादा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी,प्रश्न ऐकून घेतले. त्यातील शक्य असणाऱ्या प्रश्नांचे जागेवर निराकरण केले. उर्वरित प्रश्न त्यांनी स्वतः लिहून घेतले. धोत्रेवाडी येथे वनश्री सुरेश माळी,माधवी विजय ताटे यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
प्रतीक पाटील म्हणाले,आपल्या गावात ज्या परिसरात क्षारपड जमिनीचा प्रश्न आहे,त्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली योजनेचा लाभ घ्यावा. आपण गाताडवाडी येथे हा प्रकल्प राबवित असून दुसऱ्या टप्प्यात बोरगाव येथे हा प्रकल्प राबवित आहोत. या कामी जो खर्च येईल,त्याची परतफेड आपल्या वाढीव उत्पादनातून होऊ शकतो.
ज्या भागात पाण्याची कमतरता आहे,त्या भागात आपण ठिबक सिंचनची योजना देत आहोत. आपण कारखान्याच्या विविध योजनांची माहिती करून घ्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा.
देवराज पाटील म्हणाले,राजारामबापू साखर कारखान्याने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोरोना काळात आपल्या तिन्ही गावातील ऊस मोठ्या प्रमाणात शिल्लक होता. इतर कारखाने टोळ्या घेऊन निघून गेले. मात्र हा ऊस आपल्या राजारामबापू साखर कारखान्याने नेला आहे. आपले तीन पिढ्यांचे नाते आहे,ते आपण जपूया.
तांबवेचे सरपंच सुभाष खराडे,माजी संचालक के.के.पाटील,तानाजी मोरे,पै. अशोक मोरे,सदाशिव पाटील,सर्जेराव निंबाळकर,प्रल्हाद पाटील,पवन मोरे, अभिजित पाटील,अवधूत जाधव,धोत्रेवाडीचे सरपंच प्रदीप माने,जालिंदर जाधव,वसंतराव माळी,गुणवंत माने,शंकरराव जाधव,पोपटराव सुर्यवंशी, बाळासाहेब जाधव,राजाभाऊ ताटे, येवलेवाडीच्या सरपंच पूनम जगताप,बालाजी जगताप,निवृत्ती जगताप (गुरुजी),शिवाजी जगताप (गुरुजी),तानाजी जगताप,डॉ.वैभव जगताप,पांडुरंग जगताप,चंद्रकांत जगताप यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी,तसेच जे. बी.पाटील,प्रेमनाथ कमलाकर,धनाजी लाड, दिलीप पाटील,विकास कदम आदी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 03 Jun 2026 8:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit सांगली । कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवणे अत्यावश्यक असल्याने सातारा व सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण... Read more













































































