Last Updated on 27 Jan 2025 3:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सागर पवार (पेठ) द्वितीय विजेता, तर ऋषिकेश कदम (महादेववाडी) तिसरा विजेता ठरला
दोन दिवसात चटकदार कुस्त्या, महिला मल्लांची लक्षणीय संख्या
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित पुरुष व महिला मानधन कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात सत्यजित पाटील (नागराळे) याने प्रथम क्रमांक,सागर पवार (पेठ) याने दुसरा क्रमांक, तर ऋषिकेश कदम (महादेववाडी) याने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. माजी मंत्री आ.जयंत पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या हस्ते विजेत्या मुले व मुली मल्लांना बक्षिस वितरण करण्यात आले. याप्रसंगी १२५ जेष्ठ मल्ल व कुस्ती मार्गदर्शकांचा सन्मान करण्यात आला. राजारामबापू कुस्ती केंद्रात दोन दिवसात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेतील चटकदार कुस्त्यांनी कुस्तीप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले. माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील,कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,महाराष्ट्र केसरी आप्पासो कदम प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले, मुलींना मानधन देणारा आपला साखर कारखाना राज्यात पहिला ठरणार आहे. कुस्ती क्षेत्रात मुलांच्या बरोबर मुलींनाही चांगले भवितव्य आहे. मल्लांनी कुस्ती केंद्राचा,तालुक्याचा नाव लौकिक वाढवावा. प्रतिकदादा पाटील म्हणाले,राजारामबापू कुस्ती केंद्रास अद्यावत सुविधा देत या केंद्रातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल घडविले जातील. महाराष्ट्र केसरी आप्पासो कदम म्हणाले, मातीतील कुस्ती मॅटवर आली असून ती गतिमान झाली आहे. जो मल्ल सामाजिक बंधने पाळून अपार कष्ट करेल,तो निश्चित मोठा मल्ल बनेल.

विजेते – मुले :
४० किलो : प्रथम-निहाल पठाण जुनेखेड,द्वितीय-समर्थ विभूते बोरगाव, तृतीय-वैभवराज माने येडेनिपाणी,
४५ किलो :प्रथम-सम्राट पाटील सुरूल,व्दितीय-धैर्यशिल पाटील साखराळे,तृतीय-सोहम मासाळ कसबे डिग्रज,५० किलो-पार्थ पवार भाटवडे, द्वितीय-हर्षवर्धन खरात खरातवाडी,तृतीय- हर्षल केसरे भाटवडे,
५५ किलो : प्रथम- सतिश सूर्यवंशी काळमवाडी,द्वितीय-ओम जाधव भाटवडे,तृतीय-सुदीप कोळदार भाटवडे,
६० किलो : प्रथम-प्रतिक पाटील सुरूल,निल सावंत काळमवाडी,तृतीय- सुमित कोळदार भाटवडे,
६५ किलो : प्रथम तेजस पाटील सुरूल,द्वितीय-रोहित शिंदे महादेववाडी,तृतीय-सिद्धार्थ पाटील रेठरे धरण,
७० किलो : प्रथम-तेजस पाटील कामेरी, द्वितीय-रणजित गावडे वाळवा,तृतीय- ऋषिकेश मोहिते महादेवाडी,
७५ किलो : प्रथम सुरज माने ताकारी,द्वितीय-ऋषिकेश खबाले काळमवाडी,तृतीय-प्रथमेश पाटील रेठरे धरण,
८० किलो : प्रथम-रितेश गावडे वाटेगाव, द्वितीय-सुशांत पाटील सुरूल,तृतीय-जयराज सावंत काळमवाडी,
८६ किलो : प्रथम- समीर पठाण जुनेखेड,द्वितीय-शंतनू ताटे इस्लामपूर, तृतीय- कार्तिक खरात खरातवाडी,
९२ किलो : प्रथम- मनिष पवार मसुचीवाडी,द्वितीय-रोहन पाटील सुरूल,
विजेत्या मुली :
३५ किलो – प्रथम-श्रावणी भालेराव बोरगाव,द्वितीय-जान्हवी झेंडे काळमवाडी,तृतीय-ईश्वरी सावंत कवठेपिरान,
४० किलो : प्रथम-वैष्णवी सावंत काळमवाडी, द्वितीय-रितिका सावंत कवठेपिरान, तृतीय- शिवानी वडिंगे कवठेपिरान,
५० किलो : प्रथम- श्रद्धा सावंत काळमवाडी,द्वितीय-श्रेया सलगर बोरगाव,
५५ किलो : प्रथम-श्रावणी सावंत काळमवाडी,द्वितीय-तनुष्का देवकर भाटवडे, तृतीय-अनुष्का चव्हाण नरसिंहपूर,
६५ किलो : प्रथम-प्रमिला बागडी तुंग,द्वितीय-सायली आडके ताकारी,
७२ किलो : प्रथम-पल्लवी बागडी तुंग,द्वितीय-श्रेया शिंदे बोरगाव,
७६ किलो : ऋतुजा जाधव भाटवडे,ऋतुजा पाटील साखराळे.
कुस्तीगीर परिषदेचे जिल्हा सचिव हणमंत जाधव,राष्ट्रीय पंच शंकरराव पाटील, वारणेचे कुस्ती प्रशिक्षक संदीप पाटील, जयदीप चौगुले माले,विनायक पाटील बोरगाव,अनिल बाबर रेठरेहरणाक्ष,धनाजी महाडिक नेर्ले यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. राजाराम चौगुले (खेबुवडे) यांनी प्रभावी समालोचन केले.
याप्रसंगी राजारामबापू दूध संघाचे माजी अध्यक्ष विनायक पाटील कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,पै.शिवाजीराव साळुंखे,माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी सभापती खंडेराव जाधव,नेर्ल्याचे संजय पाटील, आनंदराव धुमाळ,उपमहाराष्ट्र केसरी अशोक मोरे,पै.अशोक जाधव नागराळे,सुहास पाटील,सौ.पुष्पलता खरात,भास्करराव पाटील,शंकरराव भोसले,तानाजी खराडे, नजरुद्दीन नायकवडी तसेच कारखान्याचे संचालक,गावोगावचे मान्यवर व कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालक कार्तिक पाटील,अमरसिंह साळुंखे,डॉ.योजना शिंदे-पाटील,पै.विकास पाटील,पै.विलास शिंदे,पै.विनायक पाटील, पै.राजेंद्र गावडे,अँड.विवेकानंद मोरे, पै.तानाजी खरात,कुस्ती प्रशिक्षक कुंडलिक गायकवाड,नितीन सलगर यांच्यासह कुस्ती समितीने स्पर्धचे उत्कृष्ठ आयोजन केले.








































































