Last Updated on 24 Oct 2024 10:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात राष्ट्रीय पक्ष काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणे बाकी होते. दरम्यान आता काँग्रेसनेदेखील आपल्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे. या यादीनुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साकोलीतून, बाळासाहेब थोरात संगमनेरमधून, विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीमधून, पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून, निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडीतल्या अन्य दोन घटकपक्षांनीही पहिली यादी प्रसिद्ध केली असून आता मविआचा एकत्रित विचार करता 158 जागांवरचे उमेदवार जाहीर झाले आहेत.
कसबा पेठेतून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना धारावी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. माजी मंत्री आरिफ नसीम खान यांना चांदिवलीमधून उमेदवारी मिळाली आहे. साकोलीमधून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रिंगणात असतील. ब्रम्हपुरीमधून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अक्कलकुवातून के. सी. पाडवी, शहादा येथून राजेंद्र गावित, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील, नंदुरबारमधून किरण तडवी, रावेरमधून धनंजय चौधरी, मलकापूरमधून राजेश एकडे, नवापूर येथून शिरीशकुमार नाईक, चिखलीतून राहुल बोंद्रे यांच्या नावांचा समावेश आहे.
उत्तर नागपूरमधून नितीन राऊत, पश्चिम नागपूरमधून विकास ठाकरे, देवळी (वर्धा)मधून रणजित कांबळे, राजूरा ( चंद्रपूर)मतदार संघातून सुभाष धोटे, अमरावती शहरमधू डॉ सुनील देशमुख, अचलपूरमधून बबलू देशमुख तर कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने त्यांची यादी जाहीर केल्यानंतर अखेर आज सर्वात शेवटी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रमुख पक्षांपैकी सर्वात उशीरा काँग्रेस पक्षाने यादी जाहीर केली आहे.
उमेदवारांची पहिली यादी
1.अकलकुवा – ॲड. के.सी. पडवी (ST)
2.शहादा – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)
3. नंदुरबार – किरण दामोदर तडवी (ST)
4.नवापूर – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)
5.साक्री – एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर – ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर – राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड – अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12.अमरावती – डॉ. सुनील देशमुख
13.तेओसा – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर – अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी – रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती – बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे
19.नागपूर उत्तर – SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21.गोंदिया- गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा- सुभाष रामचंद्रराव धोटे
23.ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
24.चिमूर – सतीश मनोहरराव वारजूकर
25.हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26 भोकर- तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
27 नायगाव – मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28 पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
29 फुलंब्री – विलास केशवराव औताडे
30 मीरा भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन
31 मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
32 चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
33 धारावी – डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)
34 मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल
35 पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
36 भोर – संग्राम अनंतराव थोपटे
37 कसबा पेठ – रवींद्र हेमराज धंगेकर
38 संगमनेर – विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
39 शिर्डी – प्रभावती जे.घोगरे
40 लातूर – ग्रामीण धिरज विलासराव देशमुख
41 लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
42 अक्कलकोट – सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे
43 कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज संजय पाटील
45 करवीर – राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले – राजू जयंतराव आवळे (SC)
47 पलूस-कडेगाव – डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जत – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत









































































