Last Updated on 14 Jul 2022 6:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित
मुंबई ।
राज्यातील 92 नगर परिषदांसह 4 नगर पंचायतींच्या निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.19 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिताही आता लागू होणार नाही.निवडणूक आयोगाकडून याबाबतचे परित्रक काढण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आज धाडलेल्या अध्यादेशात राज्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल असेही आयोगाने सांगितले आहे. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींच्या परिसरातील आचारसंहिता आता संपृष्टात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर होणार घोषणा
निवडणूक आयोगाने 8 जुलै रोजी नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
निवडणुका स्थगित झालेल्या नगरपरिषदांची नावे
‘अ’ वर्ग :
जळगाव- भुसावळ.
पुणे- बारामती.
सोलापूर- बार्शी.
जालना- जालना.
बीड- बीड
उस्मानाबाद- उस्मानाबाद.
‘ब’ वर्ग :
नाशिक- मनमाड, सिन्नर व येवला.
धुळे- दोंडाईचा वरवाडे व शिरपूर वरवाडे. नंदुरबार- शहादा.
जळगाव- अमळनेर व चाळीसगाव. अहमदनगर- कोपरगाव, संगमनेर व श्रीरामपूर.
पुणे- चाकण व दौंड.
सातारा- कराड व फलटण.
सांगली- इस्लामपूर व विटा.
सोलापूर- अक्कलकोट, पंढरपूर व अकलूज.
कोल्हापूर- जयसिंगपूर.
औरंगाबाद- कन्नड व पैठण.
बीड- अंबेजोगाई, माजलगाव व परळी- वैजनाथ.
लातूर- अहमदपूर. अमरावती- अंजनगाव.
‘क’ वर्ग :
नाशिक- चांदवड, नांदगाव, सटाणा व भगूर.
जळगाव- वरणगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा व यावल.
अहमदनगर- जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता व राहुरी.
पुणे- राजगुरूनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड व शिरूर.
सातारा- म्हसवड, रहिमतपूर व वाई.
सांगली- आष्टा, तासगांव व पलूस.
सोलापूर- मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा व सांगोला.
कोल्हापूर- गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड व वडगांव.
औरंगाबाद- गंगापूर व खुलताबाद.
जालना- अंबड, भोकरदन व परतूर.
बीड- गेवराई व किल्ले धारूर.
उस्मानाबाद- भूम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, उमरगा, परांडा व तुळजापूर.
लातूर- निलंगा व औसा.
अमरावती- दर्यापूर. बुलढाणा- देऊळगावराजा.
नगरपंचायती :
अहमदनगर- नेवासा. पुणे- मंचर व माळेगाव बुद्रुक. सोलापूर- अनगर.










































































