Last Updated on 04 Oct 2022 3:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्यातील सर्वसामन्यांची दिवाळी यंदा होणार गोड
शिधापत्रिकाधारकांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल केवळ 100 रुपयात
मुंबई | राज्यातील सर्वसामन्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. शिंदे सरकारने दिवाळीनिमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल केवळ 100 रुपयात देण्यात येणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
शिंदे सरकारकडून गोरगरीबांना दिवाळी फाराळाचे पॅकेज देण्यात येणार आहे. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती 1 किलो रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 486 कोटी 94 लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली.
शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.










































































