Last Updated on 19 Mar 2025 5:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
स्वाभिमानी मतदारांचा निर्णय अंतिम! पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या निर्णयानंतर घोषणा
निसटत्या पराभवानंतर मोठा राजकीय निर्णय – निशिकांत भोसले-पाटील यांची भूमिका स्पष्ट!
सांगली : इस्लामपुर विधानसभा निवडणुकीतील निसटता पराभव हा स्वाभिमानी मतदारांच्या जिवाला लागला आहे,राजकारणातील सतत च्या बदलत्या घडामोडीमुळे ज्या नेतृत्वाने गेली ३५ वर्षे अन्यायाचे,घराघरात फुट पाडण्याचे,कार्यकर्त्यांना अपमानीत करण्याचे काम केले.त्या नेतृत्वाचा व माझा अनेकवेळा टोकाचा संघर्ष झाला.तेच नेतृत्व भाजपा च्या नेतेमंडळीच्या मागेपुढे लुडबुड करत असेल,भाजपा प्रवेशाची स्वप्ने पहात असेल तर स्वाभीमानी मतदारांच्या निर्णयाबरोबर राहुन यापुढे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या नेतृत्वाबरोबर काम करु असा निर्णय सांगली जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष व महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदार यांच्या मेळाव्यात जाहीर केला.
प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात स्वाभीमानी मतदार ,भाजपा पदाधिकारी,कार्यकार्ते यांचा संवाद मेळावा आयोजीत करण्यात आला होता.यावेळी निशिकांत भोसले पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे जेष्ठ नेते व उरूण इस्लामपुर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक एल.एन.शहा होते. स्वागत व प्रास्ताविक वाळवा तालुका भाजपा उपाध्यक्ष प्रा.दत्तात्रय पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना निशिकांत भोसले पाटील म्हणाले, गेली दहा वर्षे भाजपा पक्षाचे विचार व काम घराघरात पोहचविले, कामाची पोच पावती म्हणुन पक्षाने सांगली जिल्ह्याची जबाबदारी सोपविली, इस्लामपुर विधानसभा मतदार संघासह सांगली जिल्ह्यामध्ये भाजपा चे संघटनात्मक काम ही राज्यपातळीवर पक्ष दखल घेईल असे केले, कामाचे कौतुक ही झाले,माझ्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वास होता,भाजपा पक्ष या मतदार संघातील उमेदवारी खेचुन आणेल, मात्र वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन आपणास महायुती चा उमेदवार म्हणुन राष्ट्रवादी पक्षाकडुन लढण्याचा आदेश आला. त्याचे पालन करत तुमच्या व मित्र पक्षाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्याच्या बळावर लढलो, निसटता पराभव मान्य करुन न खचता पुन्हां मतदार संघातील स्वाभीमानी मतदारांच्या हितासाठी, न्यायासाठी,हक्कासाठी लढण्यासाठी सदैव तुमच्याबरोबर एक कुटुंब म्हणुन मी तुमच्या बरोबर आहे.
कटकारस्थानी वाटणीला नको
यावेळी धैर्यशील मोरे, निवास पाटील, दादासाहेब रसाळ, अशोक खोत ,मधुकर हुबाले, माणिक आवटी, संजय बेले यांनी आपल्या भाषणात आ.जयंत पाटील यांना लक्ष करत हा पराभव निशिकांतदादांच्यासह स्वाभिमानी मतदारांचा आहे, गेली ३५ वर्षे या मतदार संघातील जनता दहशतीखाली आहे, कटकारस्थानी नेतृत्वामुळे अनेक कुटुंब उध्ववस्त झाली, सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेला अपमानाची वागणुक मिळाली, सत्तेचा वापर करत पोलीस, प्रशासनातील अधिकारी यांच्यावर दबाव टाकत विरोधकांना लक्ष केले, जाणीवपुर्वक विकास साधला गेला नाही, अनेक क्रांतीकारक या तालुक्याने दिले मात्र त्याचे कर्तृत्व दुर्लक्षीत ठेवण्याचे काम या नेतृत्वाने केले, आरोग्य व शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणार्या निशिकांतदादांना ही नेतृत्वाने त्रास दिला. सर्वसामान्य संघर्ष नको म्हणुन दबावाखाली राहीले, मात्र निशिकांतदादांच्या संघटनात्मक,विकासात्मक कामामुळे खर्या अर्थाने मतदासंघातील स्वाभीमानी जनतेला खर्या अर्थाने बळ आले आहे. सत्तेला चिटकुन राहाण्यासाठी भाजपा नेत्यांच्या मागेपुढे करणार्या स्वार्थी, कटकारस्थानी नेतृत्वाला आमचा कायम विरोध असेल यासाठी भविष्यातील राजकारण डोळ्यासमोर ठेवुन आपण राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा घेण्याचा निर्णय उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
निर्णय स्विकारला आता राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा
उपस्थित पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी मांडलेल्या विचारातुन व सुरातुन आपला विरोधक जयंत पाटील आहेत. त्यासाठी यापुढे आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करु असे स्पष्ट झाले, यानंतर निशिकांतदादा म्हणाले, तुमचा निर्णय असेल तो माझा निर्णय असेल तुम्ही माझे खर्या अर्थाने शक्तीपीठ आहात, तुमच्यासाठी व मतदारसंघाच्या विकासासाठी पुढील पाच वर्षे मोठ्या जबाबदारीने काम करु,महायुतीचे सरकार आपल्याला निधी कमी पडु देणार नाही,या क्षणापासुन मी व तुम्ही एकीच्या बळाने काम करुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकु व राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट) यांची विक्रमी सभासद नोंदणी करु असा निर्धार करुन विश्वास दिला. आभार रणजीत माने यांनी मानले.
यावेळी सांगली बाजार समिती माजी संचालक कुमार पाटील, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण माने, कसबे डिग्रजचे माजी सरपंच राजेंद्र जाधव, नरसिंहपुरच्या सरपंच शोभाताई जगताप, बागणीचे माजी उपसरपंच संतोष घनवट, ताकारीचे उपसरपंच नितीन पाटील, कारंदवाडीच्या उपसरपंच अरुणा हजारे, फार्णेवाडीचे उपसरपंच रणधीर फार्णे, कारंदवाडी सोसायटीचे चेअरमन अनिल सरदेशमुख, चंद्रकांत पाटील, सतेज पाटील, प्रदीप पोळ,अजित पाटील, अक्षय पाटील, संदीप गायकवाड, डाॅ.संभाजी तळप, सुरेखा जगताप, वंदना थोरात, अभिजित पाटील वाळवा, वसंत कदम, शरद पाटील, सचिन सावंत, बाजीराव जमदाडे, सचिन लोढे, यदुराज थोरात, अनिकेत पाटील, शुभम पाटील, नाथगोंडा पाटील, विजय शिंदे, शिवाजी पिंपळे, कुमार मलमे, विजय मसुकते, दिपक मगदूम, संजय हजारे, पवन सुतार, सुरज घनवट, निशांत मुढे, विश्वास पाटील, माणिक जाधव, अक्षय मोरे, बंडा पाटील, संग्राम पाटील, राहुल मोहिते, दिलीप लाड, राकेश पाटील, हणमंत चव्हाण, पै धनाजी पाटील, दीपक विक्रम शिंदे, रवींद्र पिसाळ, सर्जेराव खोत, एकनाथ निकम पाटील, राहुल खोत आदिसह अन्य मान्यवर पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 12 Mar 2026 11:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे आवाहन ✦ एलपीजी कंपनीच्या विक्री अधिकारी/प्रतिनिधींच्या बैठकीत सूचना ✦ दक्षता व फिरते पथक नियुक्... Read more












































































