Last Updated on 21 Nov 2023 8:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराला भेट देवून सहकुटुंब दर्शन घेतले.
तत्पुर्वी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्वागत कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरात मुख्यमंत्री महोदयांनी भेट देवून उपस्थित भाविकांना नमस्कार केला.

तसेच मंदिरात विधिवत पूजा करून मुख्यमंत्री महोदयांनी सपत्नीक देवीला ओटी अर्पण केली.यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यामध्ये सर्वांच्या घरामधे सुखसमृद्धी लाभावी अशी मागणी देवीकडे केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.







































































