Last Updated on 21 Oct 2023 1:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सम्राट महाडीक यांची घणाघाती टिका : पेठनाक्यावर महाविकास आघाडीचा निषेध
कॉग्रेस,राष्ट्रवादी कंत्राटी पदभरत्यांची जननी; ठाकरेंच्या सहीने कंत्राटी भरत्या
सांगली । काँग्रेस, राष्ट्रवादी ही कंत्राटी पदभरत्यांची जननी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात खा.शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सहीने कंत्राटी भरत्या झाल्या आहेत.आणि आता तेच जनतेचे दिशाभूल करत आहेत.याचा पर्दाफाश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती रद्द करून केला आहे.महाराष्ट्रातील बेरोजगारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले असल्याची घणाघाती टिका शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडीक यांनी केली.
पेठनाका येथे महाविकास आघाडीने केलेल्या कंत्राटी भरतीच्या पापाचा निषेध करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील,वाळवा पश्चिम मॅडलचे अध्यक्ष डॉ. सचिन पाटील प्रमुख उपस्थित होते.
महाडीक पुढे म्हणाले, आयुष्य सत्तेच्या खुर्च्या मिळविण्यात गेले, जनतेने नाकारूनही अडीच वर्षे विश्वासघात करून सत्ता मिळवली, ती गेल्याने विचलित झालेल्या नेत्याने कंत्राटी भरतीवरून गदारोळ माजवण्याचा प्रयत्न केला,तो आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हाणून पाडला आहे.महाविकास आघाडीतील नेत्यांनी तुम्ही केलेल्या पापाचे प्रायचित्त म्हणून माफी मागावी अशी मागणी केली.









































































