Last Updated on 15 Sep 2022 8:49 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा | विकासाच्या बाबतीत तेलंगणा राज्य गेल्या सात वर्षात सूक्ष्म नियोजनाच्या बळावर प्रगती साधू लागले आहे.यामध्ये कृषी क्षेत्रात त्यांनी केलेले काम क्रांतीकारी असून हा शेती विकासाचा तेलंगणा पॅटर्न महाराष्ट्राने राबवावा,असे आवाहन ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी केले.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दशरथ सावंत यांनी तेलांगणाच्या कृषी क्षेत्रातील झालेल्या बदलाची माहिती दिली.यावेळी शेतकरी नेते माणिकराव कदम,शिवाजीराव माने,बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील,प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील,प्रा.विजयराव मोहिते,बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव,अॅड. समीर देसाई आदी उपस्थित होते.
देशातील 117 शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी नुकतीच तेलांगणा राज्याचा अभ्यास दौरा केला.या अभ्यास दौर्यात महाराष्ट्रातून तिघांचा समावेश होता.यामध्ये दशरथ सावंत,माणिकराव कदम सहभागी झाले होते.
दशरथ सावंत म्हणाले,गेल्या सात वर्षात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाचा कायापालट केला आहे.सिंचन क्षेत्रात क्रांती करत ८३ हजार कोटी रुपयांची गुंतवणुक केली आहे.त्यामुळे २० लाख एकर क्षेत्र बागायत झाले आहे. तीन लाख कोटी रुपयांच्या शेती माल उत्पादनाची निर्यात करण्यात तेलांगणा राज्याने महत्वाकांक्षी काम केले आहे. ३० लाख शेतीपंपाना मोफत वीज दिली गेली.कृषी माल उत्पादनामध्ये सात ते आठ पट वाढ झाली आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले आहे.भविष्यात कर्जबाजारी होणार नाहीत यासाठी शेती विकासावर भर देतानाच शेत माल खरेदीची हमी शेतकऱ्यांना दिली आहे.तेलंगणमधील शेतकऱ्यांना हंगामपूर्व १० हजार रुपये बिनपरतीची मदत दिली जाते. यासह पीक विमा शासनाकडून उतरला जातो.शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर पुढील आठ दिवसात पाच लाख रुपये रोख स्वरूपाची मदत दिली जाते.
दशरथ सावंत म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पथदर्शी सिंचन प्रकल्प राबविले गेले आहेत. नोकरदार मंडळींकडून शेतकऱ्यांची अडवणूक व पिळवणूक होऊ नये म्हणून त्यांनी तेथील तलाठी पद रद्द करून धरणी पोर्टल विकसीत केले आहे.या पोर्टलवरूनच जमिनीच्या नोंदी व महसुली कामकाज केले जाते. तीन दिवसात नोंदीची कामे पूर्ण करण्याचे प्रशसनावर बंधन आहे. दलितांच्या आर्थिक उन्नतीसाठी दलित बंधू ही योजना राबविण्यात येत असून सदर कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. चार मजली इमारती बांधून टू बीएचके घर संबंधीत लाभार्थ्यांना दिले जात आहे. या सर्व बाबींमुळे तेलंगणा राज्याने भरीव प्रगती केली आहे.
बालविवाह रोखण्यासाठी…
रोखण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पात्र वयोमर्यादेच्या मुलींच्या लग्नासाठी १ लाख १३ हजार रुपये देण्याचे महत्वाचे पाऊल राज्य शासनाने उचलले आहे. या राज्याची आर्थिक प्रगती झाली आहे. शेती विकासावर भर देण्यात आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान सुधारले आहे. शेतकऱ्यांनी भेटी दरम्यान समाधान व्यक्त केल्याचे सावंत यांनी सांगितले.
असा आहे तेलंगणा पॅटर्न
• शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले.
• शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा
• शेतमाल खरेदीची सरकारकडून हमी
• आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले
• ३० लाख शेतीपंपाना मोफत वीज दिली गेली
• शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर पाच लाख रुपये मदत
• शेतकऱ्यांना हंगामपूर्व १० हजार रुपये बिनपरतीची मदत
हेही वाचा…
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
सावधान | पॅथालॉजी लॅबमध्ये होतोय लोकांच्या आरोग्याशी खेळ
पेट्रोलच्या जागी डिझेल…
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच












































































