Last Updated on 16 Dec 2024 7:56 AM by Sanjay Patil/Adhorekhit
ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधी सोहळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
नागपूर । राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरच्या राजभवनात पार पडला. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या १६ डिसेंबरपासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला. १९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन ३९ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राज्यातल्या नवनिर्वाचित सरकारच्या ३३ कॅबीनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी आज शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते.
या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून १९, शिवसेनेकडून ११ आणि राष्ट्रवादी काँग्रसेच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात राज्यातील ४३ मंत्रिपदांपैकी भाजपला २०, शिवसेनेला १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदे मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिदि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधीच शपथ घेतली होती. त्यानंतर आज ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर १ मंत्रीपद रिकामे ठेवण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात ३३ कॅबिनेटमंत्री आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
सर्वप्रथम भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपाच्या राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशीष शेलार, शिवेंद्रसिंह भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेच्या गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभुराज देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद जाधव पाटील, बाबासाहेब पाटील यांना राज्यपालांनी मंत्रिपदाची शपथ दिली. राज्यमंत्री म्हणून भाजपाच्या माधुरी मिसाळ, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर यांनी शिवसेनेच्या आशीष जयस्वाल, योगेश कदम यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंद्रनील नाईक यांनी शपथ घेतली.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Apr 2026 9:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit Manifestation : आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात प्रत्येकजण यशाच्या मागे धावत आहे. कष्टाला पर्याय नाही हे खरे असले,... Read more
शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांची संपूर्ण यादी
१) चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा
२) राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा
३) हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस
४) चंद्रकांत पाटील, भाजपा
५) गिरीश महाजन, भाजपा
६) गुलाबराव पाटील, शिवसेना
७) गणेश नाईक, भाजपा
८) दादा भुसे, शिवसेना
९) संजय राठोड, शिवसेना
१०) धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस
११) मंगलप्रभात लोढा, भाजपा
१२) उदय सामंत, शिवसेना
१३) जयकुमार रावल, भाजपा
१४) पंकजा मुंडे, भाजपा
१५) अतुल सावे, भाजपा
१६) अशोक उईके, भाजपा
१७) शंभूराज देसाई, शिवसेना
१८) आशिष शेलार, भाजपा
१९) दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस
२०) आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
२१) शिवेंद्रराजे भोसले, भाजपा
२२) माणिकराव कोकाटे, भाजपा
२३) जयकुमार गोरे, भाजपा
२४) नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस
२५) संजय सावकारे, भाजपा,
२६) संजय शिरसाट – शिवसेना
२७) प्रताप सरनाईक, शिवसेना
२८) भरत गोगावले, शिवसेना
२९) मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
३०) नितेश राणे, भाजपा
३१) आकाश फुंडकर, भाजपा
३२) बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
३३) प्रकाश आबिटकर, शिवसेना
३४) माधुरी मिसाळ, भाजपा (राज्यमंत्री)
३५) आशिष जैस्वाल, शिवसेना (राज्यमंत्री)
३६) पंकज भोयर, भाजपा (राज्यमंत्री)
३७) मेघना बोर्डीकर, भाजपा (राज्यमंत्री)
३८) इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (राज्यमंत्री)
३९) योगेश कदम, शिवसेना (राज्यमंत्री)
विभागवार मंत्र्यांची संख्या…
👉 फडणवीस मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्र,विदर्भाचे वर्चस्व
👉 पश्चिम महाराष्ट्राचे १० तर विदर्भाचे ९ मंत्री असणार
👉 ठाणे-कोकणचे ८ तर उ.महाराष्ट्राचे सात मंत्री असणार
👉 मराठवाड्याचे ६ तर मुंबईतले फक्त दोन मंत्री असणार
👉 फडणवीसांच्या मंत्रिमंडळात १६ जिल्ह्यांची पाटी कोरी
👉 सातारा आणि पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक ४-४ मंत्री













































































