Last Updated on 13 Sep 2023 8:48 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कोलंबो । पाकिस्तानला नमवल्यानंतर भारताच श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला.आणि त्यासह त्यांनी आशिया कपच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.भारताने प्रथम फलंदाजी करताना 213 धावा केल्या होत्या.या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 172 धावांत आटोपला.या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कुलदीप यादवने यावेळी चार विकेट्स घेत विजयात पुन्हा मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात कुलदीप यादव याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. रविंद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
भारताची नजर आता आशिया चषकाच्या आठव्या विजेतेपदावर आहे.आशिया चषक 2023 च्या अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तान किंवा श्रीलंकेशी होऊ शकतो.गुरुवारी 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुपर-4 सामना होणार आहे या सामन्यात दोन्हीपैकी कोणताही संघ जिंकेल तो, 17 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध आशिया चषक 2023 चा अंतिम सामना खेळेल.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.या फेरीत दोन्ही संघांनी विजयाने सुरुवात केली आहे. याच मैदानावर झालेल्या शेवटच्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 228 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव होता.
कुलदीप यादवच्या भेदक फिरकीच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला.भारताने दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 172 धावांत संपुष्टात आला.या विजयासह भारताने आशिया चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.










































































