Last Updated on 12 Feb 2025 9:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अहमदाबाद : भारताने इंग्लंडला तिसऱ्या वनडे मालिकेत १४२ धावांनी पराभूत करत दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडच्या संघाने गुडघे टेकल्याचे समोर आले आहे. भारत विरुद्ध इंग्लड तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय प्राप्त करीत इंग्लडला क्लीन स्वीप दिली. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडची फलंदाजी गडगडल्याचे पाहायला मिळाले.
शुबमन गिलचे शतक, विराट कोहलीचं कमबॅक अर्धशतक, श्रेयस अय्यरची वादळी खेळी आणि गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी हा मालिका विजय खूप महत्त्वाचा ठरला आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना ३५६ धावांची मोठी धावसंख्या उभारली. शुबमन गिलने शतक झळकावत शानदार कामगिरी केली तर भारताच्या टॉप फलंदाजांनी मोठ्या धावसंख्येचं योगदान दिलं आहे.इंग्लडकडून टॉम बॅन्टन वगळता इतर सर्व फलंदाज गडगडले. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर हार्दिक पांड्या यांनी इंग्लडच्या फलंदाजीला मोठे भगदाड पाडत 214 धावांवरच रोखले.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना धमाकेदार खेळी करीत 357 धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर शुभमन गील आणि विराट कोहली यांनी मोठी भागीदारी करीत संघाच्या धावसंख्येत मोठी भर टाकली. शुभमन गील आणि विराट कोहलीने धमाकेदार 116 भागीदारी केली. यामध्ये शुभमन गीलची शानदार शतकीय खेळी केली. शुभमन गीलने 112 धावांची मोठी भागीदारी केली. परंतु, विराट कोहली 78 धावांची खेळी करून बाद झाला. विराट कोहलीने आज बऱ्याच दिवसांनंतर अर्धशतकी खेळी केली त्याने 55 चेंडूत 52 धावांची खेळी केली. त्यानंतर श्रेयस अय्यरनेसुद्धा धमाकेदार खेळी 78 धावा केल्या, त्याने 64 चेंडूत 78 धावांची खेळी केली. त्यानंतर केएल राहुलने 40 धावांची खेळी केली. शेवटच्या फळीत खेळायला आलेल्या हार्दिक पांड्या, अक्षर पटेल हर्षित राणा यांनी वेगाने धावा करण्याच्या नादात विकेट दिल्या. भारतीय संघाने निर्णधारित 50 ओव्हरमध्ये 356 धावांची मोठी खेळी केली.
भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर यांनी शानदार गोलंदाजी करीत इंगल्डला पाणी पाजले. भारताने विजयासाठी दिलेल्या 357 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. फिलीप सॉल्ट आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. तर टॉम ब्रॅडनने सॉल्टसह ही भाीदारी वाढवली. पण त्यानंतर घसरगुंडी सुरु झाली. मधल्या फळीतील फलंदाज सपशेल फेल ठरले.












































































