Last Updated on 18 Dec 2024 9:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज, रवीचंद्रन अश्विन यानं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्याच्या काळातला सर्वोत्तम फिरकी गोलंदाज असलेल्या अश्विनच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. तब्बल 37 वेळा पाच किंवा पाचपेक्षा जास्त फलंदाजांना बाद करण्याची कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज असलेल्या अश्विननं भारतीय क्रिकेटमध्ये मोठं योगदान दिलं.
क्रिकेटमधला विचारवंत असं अश्विनला म्हणावं लागेल. गोलंदाजीमध्ये कमालीची विविधता असलेला अश्विन ऑफ स्पिन गोलंदाजीतही नवनवे प्रयोग करत रहायचा. गोलंदाजीच्या टप्प्यातले बदल, चेंडूची फिरकी, ऑफ ब्रेक गोलंदाजीच्या ऍक्शननेच, दुसरा या नावाने ओळखला जाणारा लेग ब्रेक चेंडू टाकून फलंदाजांना गोंधळात टाकण्याचं कसब अश्विनकडे असल्यानं, भारताच्या कसोटी विजयात अनेकदा अश्विनचा सिंहाचा वाटा असायचा.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 09 Aug 2026 11:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit पुणे येथे डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनकडून सन्मान देशभरातील साखर उद्योगातील मान्यवरांची उपस्थिती शिवनगर । यशवंतराव मो... Read more
अनिल कुंबळे , हरभजन सिंग यांच्या निवृत्तीनंतर भारताच्या फिरकी गोलदांजीचा दबदबा अश्विननं कायम ठेवला होता. केवळ गोलंदाजीतच नाही तर अनेकदा फलंदाजीतही अश्विननं आपली चमक दाखवली आणि अनेकदा संघाला अडचणीतून बाहेर काढलं तर खूपवेळा संघाच्या विजयातही योगदान दिलं.
सध्याच्या काळात अश्विन इतकी गुणवत्ता असलेला फिरकी गोलंदाज इतर कोणत्याही संघात नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.










































































