Last Updated on 08 Oct 2023 8:14 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षातील कामाचे संपुर्ण जगभरात कौतुक
सांगली । गेल्या 9 वर्षातील मोदी सरकारच्या कामाचे कौतुक संपुर्ण जगभरात होत आहे.भाजपा पक्षाचा विचार व संघटनात्मक काम हे खर्या अर्थाने भाजपा पक्षाच्या नेत्यांना सत्तेवर बसविण्यासाठी महत्वाची भुमिका बजावत आहे.आपल्या पक्षामध्ये सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाची दखल घेवुन त्याचा सन्मान करण्याची किंवा त्याला पदावर बसविण्याची संस्कृती आहे.आपल्या पक्षामध्ये निष्ठेला व कर्तृत्वाला महत्व असुन आपण स्वतःला भाजपा पक्षाचा प्रमुख म्हणुन काम करत रहा,आपलाही योग्य वेळी सन्मान होईल असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

इस्लामपुर येथे हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इस्लामपुर, शिराळा व शाहुवाडी विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या 450 वाॅरियर्स यांच्याशी त्यांनी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुरेश खाडे हे होते यावेळी खासदार संजय पाटील,भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,भाजपा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मुरलीधर मोहोळ,भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील,सांगली लोकसभा मतदार संघाचे प्रभारी शेखर इनामदार, कोल्हापूर पुर्व भाजपा जिल्हा अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर,शाहुवाडी विधानसभा निवडणुक प्रमुख राजु प्रभावळकर,अमरसिंह भोसले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील 450 वाॅरियर्सशी संवाद साधताना म्हणाले, केंद्रातील व राज्यातील सरकारने विविध योजनांच्या माध्यमातुन देशातील प्रत्येक घटकाचा अर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केला आहे.विविध योजना थेट घरापर्यंत पोहचल्या आहेत. हेच काम आपल्याला 2024 मध्ये महाविजयापर्यंत पोहचविणार आहे. तुम्ही सर्वांनी गेल्या 9 वर्षातील विकास कामाचा लेखा जोखा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगामध्ये झालेला सन्मान, त्यांनी केलेले काम थेट लोकांच्यापर्यंत पोहचवा.लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहा.सर्व श्रेष्ठ भारत बनविण्यासाठी आपल्यासारख्या वाॅरियर्स यांची गरज भाजपा पक्षाला व देशाला आहे. आपण देशाच्या विकासासाठी देशसेवक म्हणुन काम करत आहोत.आपण फक्त भाजपा पक्षाचे संघटनात्मक काम करत नसुन याच कामातुन भविष्यात आत्मनिर्भय भारत घडविण्याचे काम करत आहे.यामुळे भविष्यातील आपली पिढी मोठया अभिमानाने सांगेल यामध्ये माझ्या कुटुंबातील व्यक्तिचे योगदान आहे.विरोधकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर हे आपण विचाराने व विकासकामाच्या माध्यमातून द्यावे असे शेवटी सांगत त्यांनी वाॅरियर्सशी थेट संवाद साधला.यावेळी वाॅरियर्स यांच्या शंकेचे व प्रश्नाचे निरसन ही त्यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे प्रभारी सत्यजीत देशमुख यांनी केले.आभार शिराळा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक यांनी केलेयावेळी सांगली जिल्हा भाजपा कोअर कमिटीचे सदस्य सी.बी.पाटील,भाजपाचे प्रदेश विशेष निमंत्रीत सदस्य प्रसाद पाटील,भाजपाचे सुदर्शन पाटसकर,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील, भाजपाचे वाळवा तालुका अध्यक्ष निवास पाटील,वाळवा पश्चिम मंडल अध्यक्ष डाॅ. सचिन पाटील,शिराळा तालुका भाजपाचे अध्यक्ष हणमंतराव पाटील,माजी अध्यक्ष धैर्यशील मोरे, भाजपाचे वाळवा ओ.बी.सी. सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले,युवा मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत पाटील,संघटन सरचिटणीस संदीप सावंत,सरचिटणीस दादासाहेब रसाळ,यदुराज थोरात आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते.










































































