Last Updated on 06 Dec 2023 6:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । लोकसभा निवडणुक निकालानंतर लगेचच भाजपच्या 10 खासदारांनी राजीनामा दिला आहे.पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर या खासदारांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.त्यामध्ये दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.
खासदार किरोरी लाल मीना, राज्यवर्धन सिंह राठौर, नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, राकेश सिंह, उदय प्रताप, रीती पाठक, अरुण साओ, गोमती साई आणि दिया कुमारी अशी या भाजप नेत्यांची नावे आहेत.तर बाबा बालकनाथ आणि रेणुका सिंह यांनी अद्याप राजीनामे दिलेले नाहीत.पण ते आज लोकसभेत आले नाहीत.दोघेही लवकरच राजीनामा सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे.
मध्य प्रदेश,राजस्थान,छत्तीसगड,तेलंगणा या महत्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर झाले आहेत.या निवडणुकीसाठीभाजपने एकूण 21 खासदारांना उमेदवारी दिली होती.राजस्थानात 7 आणि मध्यप्रदेशात 7 तसेच तेलंगणामध्ये 3 आणि छत्तीसगडमधील 4 खासदारांचा समावेश होता.यात 12 जण विजयाची झाले.इतर 9 खासदार निवडणुकीत पराभूत झाले.
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या अनेक खासदारांना मैदानात उतरवून सर्वांनाच चकित केले होते. भाजपची ही योजना कामी आली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या अध्यक्षांसोबत केले. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या अशा खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली.त्यानंतर त्यांनी राजीनामे सादर केले.









































































