Last Updated on 11 Sep 2023 9:09 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पेठनाक्यावर अजित पवार यांचा भव्य सत्कार : महाडीक बंधूंनी दिली चांदीची तलवार भेट
सांगली । पेठनाका ही वनश्री स्व.नानासाहेब महाडीक यांची कर्मभूमी आहे.त्यांच्या पश्चात राहुलदादा महाडीक व सम्राटबाबा महाडीक यांनी शिक्षण, उद्योग क्षेत्र सक्षम पणे सांभाळले आहे.हे दोन बंधू न डगमगता उभे आहेत.सांगली जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय जीवनात त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार आहे,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
महाडीक समर्थकांच्यावतीने पेठनाका येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राहुलदादा महाडीक व भाजपचे शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राटबाबा यांनी चांदीची तलवार भेट दिली.यावेळी ते बोलत होते. दरम्यान वनश्री स्व.नानासाहेब महाडीक यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. व महाडीक संकुलाची पहाणी केली.तसेच वाळवा व शिराळा तालुक्याचा आढावा घेतला.
यावेळी आ. मंकरद पाटील,मुंबई मार्केट कमिटीचे सभापती अशोक डक, माजी मंत्री सदाभाऊ खोत,माजी आ. भगवानराव साळुंखे, युवानेते पार्थ पवार,सी.बी पाटील,शिवसेना शिंदेगट जिल्हाप्रमुख आनंदराव पवार,विट्याचे वैभव पाटील,पै.भिमराव माने,स्वरूपराव पाटील,विक्रम पाटील,जयसिंगराव शिंदे,डॉ.सचिन पाटील,केदार नलवडे,सतिश महाडीक,अशोकराव माने,कपिल ओसवाल,जगन्नाथ माळी,पद्माकर जगदाळे,इद्रीस नायकवडी,विठ्ठल पाटील,निजाम मुलाणी यांची उपस्थिती होती.
हेही वाचा – ‘गणेश चतुर्थी’ : शास्त्र काय सांगते?…जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त

उपमुख्यंमत्री पवार पुढे म्हणाले,भविष्यात त्यांना राजकीय योग्य संधी तसेच संस्थामक उभारणीसाठी सहकार्य करू.दिल्लीमध्ये सध्या जी.२० परिषद सुरू आहे.अनेक देशाचे प्रमुख आले आहेत.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतुर्वात देश प्रगती करत आहे त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला आम्ही ताकदीने पुढे घेवून जात आहे.
यावेळी प्राचार्य महेश जोशी,अमोल पडळकर,चेतन शिंदे,सरगम मुल्ला,बबन शिंदे,प्रा.प्रदीप पाटील,संग्राम गोइंगडे,अर्जुन साळुंके, तिश पाटील यांच्यासह महाडीक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेठनाका फुल्ल

महाडीक बंधूंनी स्व. नानासाहेब महाडीक यांची मोठ्या नेत्यांच्या स्वागताची अविरत परंपरा राखली आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांचा सत्कार महाडीक बंधूंनी केला. यावेळी महाडीक समर्थकांनी पेठनाका फुल्ल झाला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.












































































