Last Updated on 04 Apr 2025 6:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बहे (ता. वाळवा) येथील रामलिंग बेटावर रामनवमी उत्सव रविवार दि ६ एप्रिल रोजी होणार आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असलेल्या रामलिंग बेटावर रामनवमी उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा होत असतो. यंदा ६ एप्रिल रोजी होणार आहे. दि ६ रोजी पहाटे अभिषेक, पूजा, धार्मिक विधी पार पडतील. न्यायाधीश मदन गोसावी यांचे कीर्तन होणार आहे. १२ वाजून ३५ मिनिटांनी फुले पडतील.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.










































































