Last Updated on 03 Oct 2022 11:23 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
सांगली । फेरफार अदालतीच्या निमित्ताने येथे आलेल्या प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी यांनी भाषणाला फाटा देत थेट लोकांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी लोकांच्या अडीअडचणी समजावून घेत लोकांना मार्गदर्शन केले.लोकांनी उत्स्फूर्तपणे समस्या मांडल्या.
वाळवा तालुक्यातील बहे येथे ग्रामपंचायत सभागृहात शुक्रवारी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत या ‘फेरफार अदालती’चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तहसीलदार प्रदीप उबाळे प्रामुख्याने उपस्थित होते.
![]()
विविध दाखल्यांचे वाटप
यावेळी वारस फेरफार यासह संजय गांधी निराधार योजना,विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच अन्य दाखल्यांचे वाटप करण्यात आले.त्याचबरोबर ई-पीक पाहणी करण्यासाठी मदत केलेल्या युवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
![]()
…साधला जनतेशी थेट संवाद
दाखले,प्रमाणपत्र वाटप,सत्कार यानंतर प्रांताधिकारी डॉ. खिलारी यांनी भाषणाला फाटा दिला.भाषणात वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी उपस्थित लोकांशी थेट संवाद साधला.लोकांनीही नोंदी,रस्ता,वाटणीपत्र याबाबत प्रांताधिकाऱ्यांना प्रश्न विचारले.प्रांताधिकारी डॉ. खिलारी यांनी लोकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांना कायद्यातील तरतुदींबाबत मार्गदर्शन केले.रीतसर असतील तर नोंदी मंजूर केल्या जातील.कायदा व नियम सोडून कोणाच्याही नोंदी मंजूर होणार नाहीत असे सांगितले.कायदा सोडून नोंदीचा आग्रह करून प्रशासनाला वेठीस धरू नका असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील,सरपंच सौ.छायाताई पाटील,खरातवाडीचे सरपंच पृथ्वीराज खरात,बहे सोसायटीचे अध्यक्ष जयदीप पाटील,मंडल अधिकारी तानाजी यादव,गावकामगार तलाठी अविनाश पाटील,ॲड कृष्णराव पाटील,बीजी.पाटील,मनोज पाटील,हणमंतराव पाटील,अधिक दमामे,वैभव पाटील,संतोष दमामे,कालिदास पाटील,गणेश पाटील,अधिक बडवे,रोहित तोरस्कर,अरुण डुकरे आदी उपस्थित होते.रोहित तोरस्कर यांनी स्वागत,तलाठी अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक केले.तर सोसायटीचे अध्यक्ष जयदीप पाटील यांनी आभार मानले.मंडल अधिकारी तानाजी यादव,बहेचे तलाठी अविनाश पाटील,तांबवेचे तलाठी सचिन सावंत,शिरटे- नरसिंहपूर तलाठी सुरेश कबुडे,कोळे तलाठी सुरय्या शेख,हुबालवाडी-खरातवाडीच्या तलाठी शुभांगी चौगुले आदींनी संयोजन केले.यावेळी बहे मंडळमधील बहे,तांबवे,शिरटे,नरसिंहपूर,कोळे,हुबालवाडी,खरातवाडी आदी गावातील शेतकरी-ग्रामस्थ उपस्थित होते.
![]()












































































