Last Updated on 02 Sep 2023 10:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली.
शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विद्या परिषदमधून निवडून द्यावयाच्या दोन सदस्यासाठी शनिवारी मतदान प्रक्रिया झाली.यामध्ये शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या सदस्यांनी बाजी मारली.व्यवस्थापन परिषदेवर डॉ.जगदीश सपकाळे,डॉ. वर्षा मैदर्गी निवडून आले.दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर प्राचार्य अरुण जाधव हे निवडून आले.
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर विद्या परिषद मधून एक सदस्य पाठवायचा होता.यामध्ये विकास आघाडीकडून प्राचार्य अरुण जाधव व सुटाकडून डॉ. रूपाली संकपाळ उमेदवार होते.यामध्ये प्राचार्य जाधव निवडून आले.प्राचार्य जाधव यांना 27 मते तर संकपाळ यांना 15 मते मिळाली.

वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे मानद सचिव ॲड. बी.एस.पाटील,संस्थेचे सहसचिव ॲड.धैर्यशील पाटील यांनी प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.






































































