Last Updated on 31 Aug 2023 10:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळा येथे गॅटी बसवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.01) या महामार्गावर दुपारी 12 ते 2 या वेळेत पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.
दरम्यान, वाहतूक खंडाळा एक्झिट मार्ग म्हणजेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळविण्यात आली आहे.वळवण येथील नाक्यावरून पुन्हा पुण्याच्या दिशेने द्रुतगती मार्गावरून जाता येणार आहे,अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.













































































