Last Updated on 12 Sep 2025 2:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल
सातारा । कास पुष्प पठार परीसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये ३१ ऑक्टोंबरपर्यंत वाहतुकीत बदल केले आहेत.
साताऱ्याकडून कास पुष्प पठार व बामणोली बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही सातारावरुन कास पुष्प पठार कास धरण वरुन बामणोली कडे जाईल.
बामणोली व कास धरणाकडून सातारा बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही बामणोली कास धरण बाजुने घाटाई देवी मंदीर मार्ग घाटाई फाट्यावरुन साताराकडे जाईल.
घाटाई फाटा ते कास पुष्प पठार, कास धरण या मार्गावरुन कास धरणाकडे व बामणोली कडे जाण्यासाठी एकेरी वाहतुक राहील.
Source : District Information Office, satara
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 09 Aug 2026 11:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit पुणे येथे डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनकडून सन्मान देशभरातील साखर उद्योगातील मान्यवरांची उपस्थिती शिवनगर । यशवंतराव मो... Read more










































































