Last Updated on 02 Dec 2024 7:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सिंधुदुर्ग । मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही सीगल पक्ष्यांचं आगमन झालं आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून दाखल झालेल्या या परदेशी पाहुण्यांमुळे मालवण दांडी, देवबाग, भोगवे आदी समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत.
थंडीचा हंगाम सुरु झाला की युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करत सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर हे सीगल पक्षी दाखल होतात. समुदात किनाऱ्यावर मिळणारे मासे, किडे, शिंपल्यातले जीव हे या पक्ष्यांचे खाद्य आहे. हे पक्षी थव्याने उडत राहून किनारा बदलत राहतात किंवा पाण्यात बसून राहतात. किनाऱ्यावरच्या या पक्षांच्या वावरामुळे विलोभनीय दृश्य पाहायला मिळत आहे.
सिंगल पक्षांचा मुक्काम दोन ते तीन महिने सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर राहणार आहे. सध्या सिंधुदुर्गात पर्यटकांची रेलचेल वाढली असतानाच किनारपट्टीवर सीगल पक्षांचे थवे उडताना दिसू लागल्याने पर्यटकांसाठी ती एका पर्वणी ठरत आहे.
साभार : प्रसार भारती












































































