Last Updated on 16 Nov 2025 5:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा (De-Novo) कार्यक्रम सुरू असून प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३ डिसेंबर व अंतिम मतदार याद्या तयार करण्यास १२ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदान अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- शुक्रवार २८ नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी- बुधवार ३ डिसेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- ३ ते १८ डिसेंबर, दावे व हरकती निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- सोमवार ५ जानेवारी २०२६ व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी- सोमवार १२ जानेवारी २०२६ रोजी करण्यात येईल.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 16 Jun 2026 6:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit परवानाधारक औषधविक्रेत्यांकडूनच विक्री अनिवार्य, केंद्र सरकारचा निर्णय नवी दिल्ली । केंद्र सरकारने देशभरातील औषध विक्रीच्या निय... Read more










































































