Last Updated on 20 Sep 2024 8:08 AM by Sanjay Patil/Adhorekhit
‘राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा’ आणि विविध दूरदर्शी योजनांचा शुभारंभ!
विश्वकर्मा योजनेतील यशस्वीगाथा दर्शविण्यासाठी भव्य थीम पॅव्हेलीयनची निर्मिती
थीम पॅव्हेलियनमध्ये पंतप्रधानांचा लाभार्थ्यांशी संवाद
वर्धा । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते वर्धा इथं विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वाटप करतील. या योजनेच्या एक वर्षाच्या यशस्वी पूर्ततेसाठी ते पोस्टाच्या तिकिटाचं अनावरणही करणार आहेत. राज्य सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन करणार आहेत.
याअंतर्गत १५ ते ४५ वयोगटातल्या तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी, रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरातल्या नामांकित महाविद्यालयामध्ये ही केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. त्यानंतर ते अमरावती इथं पीएम मित्र अर्थात पीएम मेगा इंटेग्रेटेड टेक्स्टाईल रिजन्स अँड ऍपरल पार्कची दूरदृश्य प्रणालीद्वारे पायाभरणी करतील. या एक हजार एकरवर पसरलेल्या पार्कची निर्मिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी सात पीएम मित्रा पार्कला मान्यता दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचंही अनावरण मोदी करणार आहेत.
ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने गतवर्षी पी.एम. विश्वकर्मा योजना कार्यान्वित करण्यात आली होती . या योजनेचा वर्षपुर्ती सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा येथे होत असून यासाठी भव्यदिव्य थीम पॅव्हेलियन उभारण्यात आला आहे.
भव्यदिव्य थीम पॅव्हेलियन…










































































