Last Updated on 02 Mar 2022 9:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
महामारीतून सावरणाऱ्या भारताच्या युवकांसाठी एक चांगली बातमी आहे. विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात भर्ती सुरु झाल्याने 2022 चा सुरवातीचा महिना नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी सर्वोत्तम ठरला आहे.
नोकरी जॉबस्पीक निर्देशांकानुसार, जानेवारीमध्ये झालेल्या भरतीत वार्षिक आधारावर विक्रमी 41 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.जानेवारी 2021 च्या 1925 च्या तुलनेत जानेवारी 2022 मध्ये निर्देशांक 2,716 च्या स्तरावर पोहोचला आहे.
नव्या नोकऱ्या प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान – सॉफ्टवेअर, रिटेल आणि दूरसंचार या सारख्या क्षेत्रांत सर्वात जास्त होती. कारण कॉर्पोरेट जग भविष्यातील शक्यता बघता अतिशय उत्साहित होते. 2021 च्या तुलनेत बहुतांश महत्वाच्या क्षेत्रांत मजबूत वाढ होण्याचे संकेत दिसून आले.
दूरसंचार (48 टक्के), शिक्षण क्षेत्र (31 टक्के), औषध उत्पादन (29 टक्के), वैद्यकीय/आरोग्य (10 टक्के), तेल आणि गॅस/उर्जा (8 टक्के), विमा (8 टक्के), ग्राहकोपयोगी वस्तू (7 टक्के), आणि उत्पादन (2 टक्के) या सारख्या इतर क्षेत्रांत देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत नोकऱ्या वाढल्या आहेत.












































































