Last Updated on 22 May 2025 6:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
फटाक्याची आतिषबाजी व जयघोषाने इस्लामपुर शहर दुमदुमले
सांगली । इस्लामपुर नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या सांगली जिल्हा (ग्रामीण) च्या अध्यक्ष पदी निवड झाली. या निवडीचा कार्यक्रम मुंबई येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सभागृहात पार पडला. यानंतर त्यांचे सांगली जिल्हयामध्ये आगमन होताच फटाक्याची आतिषबाजी, पुष्पगुच्छ व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या विजयाच्या घोषणा देत मोठया उत्साहात स्वागत केले.
सर्वप्रथम कासेगाव येथे शिराळचे युवा नेते सत्यजीत नाईक, यशवंत ग्लुकोज कारखान्याचे संचालक शहाजी पाटील, भाजपा युवामोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, आटपाडीचे माजी उपसभापती हर्षवर्धन देशमुख, संग्राम उद्योग समुहाचे युवा नेते निलेश येसुगडे, माजी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिराळा तालुकाध्यक्ष अशोक पाटील, कडेगांव तालुकाध्यक्ष कृष्णात मोकळे, सांगली जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, पांडुरंग वाघमोडे, नेताजी पाटील, रणजीत पाटील, ज्ञानदेव पाटील, वाटेगावच्या उपसरपंच सौ. सोनाली पाटील, राहुल पाटील, वाळवा तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष निवास पाटील, वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सरचिटणीस संदीप सावंत, इस्लामपुर शहर भाजपाचे माजी अध्यक्ष अशोकराव खोत, साखराळेचे अशोक पाटील आदी मान्यवरांनी मोठया उत्साहात स्वागत केले.
यानंतर येडेमच्छिंद्र येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळयाला अभिवादन केले. यावेळी डॉ. सचिन पाटील, माजी सरपंच गणेश हराळे,शरद पाटील, रावसाहेब पाटील, प्रशांत पाटील, सुभाष चव्हाण, राहुल खराडे, संतोष पाटील, किल्लेमच्छिंद्रगडचे युवा नेते शशिकांत साळुंखे,वाळवा तालुका भाजपा महिला आघाडी च्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप, बिचूदचे शिरीष रसाळ, राहुल मोहिते, मसूचीवाडी चे अक्षय कदम,वसंत कदम, भडकंबेचे डाॅ. संभाजी तळप, पंडित लोंढे, शिवाजी पाटील, वसंत पाटील, शिगावचे विशाल यादव, अमृत चव्हाण, श्रीवर्धन पाटील, आविष्कार जाधव, रवी पाटील, अमोल भासर, अनिल पाटील, शरद गायकवाड, येडेनिपाणीचे सी. एच. पाटील, बागणीचे सूरज घनवट, सामडोळीचे संजय बेले, संजय हजारे, दीपक मगदूम, दस्तगीर मुजावर, मार्दवाडीचे अमोल पाटील, विश्वास पाटील, दीपक पाटील, कारंदवाडीचे अनिल सरदेशमुख, दिगंबर ठाणेकर दाजी, सचिन लोंढे, आनंद मनवर, बंडू कोळेकर, ढवळीचे अनिकेत पाटील, सचिन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
बहे येथे भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस यदुराज थोरात, भाजपा ओ.बी.सी. सेल अध्यक्ष मधुकर हुबाले, संजय मुळीक, धनंजय थोरात, भगवान यादव, दिपक मोहिते, मारूती मंडले, बाबालाल पाकजादे, मालोजी मुसळे, प्रमोद सुतार, कबीर पाकजादे, मौला फुलारे, शहाजी पाटील, प्रविण पाटील, अशोक सलगर, जयवंत थोरात, ताकारीचे आशिष पाटील, बोरगावचे संग्राम पाटील, फार्णेवाडीचे बाजीराव जमदाडे, उपसरपंच रणधीर फार्णे, नागाव उपसरपंच रणजीत मगर, खाशाबा पाटील, योगेश जंगम, खरातवाडी उपसरपंच अर्जुन खरात, शिरटे दिलीप लाड, सुनील पाटील, नृसिंहपुर सुभाष जगताप, चंद्रकांत उदुगडे अण्णा, रेठरे हरणाक्षचे अक्षय मोरे, विशाल पाटील, माणिक जाधव, रोहन मोरे आदी मान्यवरांनी स्वागत केले.

इस्लामपुर येथे आगमन होताच फटाक्याजी आतिषबाजी करत लेझीम वाद्याने स्वागत केले. यावेळी निशिकांत भोसले-पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन केले. यावेळी माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, वाळवा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष केदार पाटील, भाजपाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील, मनसेचे सनी खराडे, माजी नगरसेवक एल.एन. शहा, वैभव पवार, नरेंद्र सुर्यवंशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भागवत जाधव, दादासाहेब पाटील, वीरेंद्र राजमाने, शरद पाटील, संजय पाटील, अजित पाटील, अक्षय पाटील, भास्कर मोरे, सुधाकर जाधव, हणमंत जाधव, सयाजी जाधव, बाळासाहेब पवार, युवराज जाधव, तानाजी पाटील, उमेश जाधव, मोहन जाधव, प्रकाश जाधव, दिलीप पवार, राजेंद्र मोहिते, दादासाहेब पाटील, महादेव घारे, मयूर पाटील, तुजारपूरचे निलेश बाबर, जुनेखेडचे शिवराज पाटील, राकेश पाटील, पडवळवाडी अभिजीत खोत, वाळवा अभिजीत पाटील, बावची रणजीत माने, अमित माने, आकाश पाटील, विश्वजित पाटील, विक्रांत गुरव आदी मान्यवरांनी स्वागत केले. सर्व कार्यकर्त्यांच्यामध्ये मोठा उत्साह होता.










































































