Last Updated on 29 Sep 2022 10:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७६७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे राज्यातील या ग्रामंपचांयतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत.
राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 7 हजार 649 तसेच नवनिर्मित 8 तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 18 अशा एकूण 7 हजार 675 ग्रामपंचायतींच्या निवडणूका घेणे क्रमप्राप्त आहे.मात्र, ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे २-३ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो.त्यामुळे सुमारे 7 हजार 675 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणेकरीता आवश्यक ते नियोजन आयोगाच्या स्तरावर करण्यात येत आहे. त्यामुळं ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मुदती जसे जशा संपतील,तस तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे 2-3 महिन्यांचा कालावधी आवश्यक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामविकास विभागाल पत्र लिहून प्रशासक नेमण्याविषयी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.









































































