Last Updated on 03 Dec 2021 7:53 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नाशिक ।
लोकहितवादी मंडळ,नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘कुसुमाग्रज नगरी’, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव नाशिक येथे आजपासून पार पडत आहे. हे संमेलन दि. ३, ४ व ५ डिसेंबर रोजी होणार होणार आहे.संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध खगाेलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डाॅ. जयंत नारळीकर यांची निवड झाली असून स्वागताध्यक्ष नाशिकचे पालकमंत्री छगनराव भुजबळ हे असतील.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नाशिक मध्ये होणारे संमेलन स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर करोनाच्या संदर्भातील शासनासहीत सर्वांचे प्रयत्न निश्चितपणे कामी आले व मोठ्या प्रमाणावर या महामारीवर नियंत्रण मिळाले आहे असे सध्याचे वातावरण आहे. हळूहळू सर्वच व्यवहार सुरु करण्यासा शासनाने दिली साहजिकच नाशिकला होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी घेता येईल यावरही विचार सुरु होता. त्यानंतर एकूण परिस्थितीचा विचार करुन आणि संमेलनाध्यक्षांच्या सोयीचा विचार करता हे संमेलन नाशिक येथे दि. ३, ४ व ५ डिसेंबर २०२१ या काळात घेण्याचे ठरले.
शुक्रवारी दि. ३ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिळकवाडी येथून आपली दिंडी निघणार आहे आणि संमेलनस्थळी दिंडी पोहोचल्यावर सकाळी ११ वाजता ध्वजारोहण होईल. त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन होण्यापूर्वी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल आणि नंतर संमेलनाचे उद्घाटन होईल.दुपारी 4.00 वा. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन हाेईल. प्रथा व परंपरेनुसार स्वागताध्यक्षांचे भाषण, 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षांचा आणि उपस्थित संमेलनाच्या माजी अध्यक्षांचा सत्कार, 93 व्या संमेलनाच्या अध्यक्षांचे मनाेगत आणि नविन अध्यक्षांकडे अध्यक्षीय सूत्र प्रदान कार्यक्रम, उद्घाटकांचे भाषण, संमेलनाध्यक्ष डाॅ. जयंत नारळीकर यांचे भाषण हाेईल. सुरुवातीला स्वागत गीत, संमेलन गीत आणि अखेरीस आभार प्रदर्शन असेल.
त्याचदिवशी रात्री निमंत्रित कवींचे काव्य संमेलन होणार आहे.शनिवार 4 डिसेंबर 2021 राेजी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम सायंकाळी हाेणार आहे. संमेलनाचा समाराेप रविवार दिनांक 5 डिसेंबर 2021 राेजी सायंकाळी 6 वाजता हाेईल.समाराेपानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयाेजन केले आहे.










































































