Last Updated on 12 Oct 2025 9:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
नमस्कार…
दीपावलीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!🪔
सोशल मीडियाच्या कोणत्याही अफवांमुळे / मेजेस मुळे संभ्रमित न होता लक्ष्मी पूजन मंगळवार दि. 21 ऑक्टोबर 2025
सायंकाळी – 06 :07 ते 08:34
पंचांगाधार – दाते पंचांग
लेखन -प्रभाकर जंगम
दीपावली -2025 मुहूर्त
सोमवार
व्यापारी वह्या खरेदी मुहूर्त
मंगळवार दि. 14 ऑक्टोबर 2025
सकाळी – 09:23 ते 01:47
दुपारी – 03 :15 ते 04:43
सायंकाळी – 07: 43 ते 09 :15
बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025
सकाळी – 06ः 27 ते 09 : 23
दुपारी – 10 : 51 ते 12
- रमा एकादशी/वसुबारस
शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर 2025
अश्विन कृष्ण एकादशी अर्थात रमा एकादशी
वसुबारस-अर्थात गोधनरुपी लक्ष्मीची म्हणजे
गाईवासराचे पूजन मुहूर्त प्रदोषकाळी
सायं .06 : 09 ते 8 : 30
प्रदोष व्यापिणी म्हणजे अश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी वसुबारस शास्त्रात वसुबारस सांगितले आहे .गोधन भरपूर प्रमाणात असणे हे ऐश्वराचे प्रतिक आहे. या गोधन रुपी लक्ष्मीची पूजा सायंकाळी केली जाते. स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी वासरा – सहित गायीची पूजा करतात.
या पूजेचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता….
गोमय वसते लक्ष्मी।गोमूत्रामध्ये धन्वतरी….
आपल्या कृषिप्रधान देशात गाईचे महत्त्व वेगळेच आहे. गाईचे शेण सेंद्रीय धनधान्य पीकवाढीसाठी उत्तम खत म्हणून तर उत्तम आहेच पण दूध आणि गोमूत्राचे महत्त्व आपल्या निरामय आरोग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. यावर अनेक प्रयोगही झाले आहेत. गाई वासराचे पूजन म्हणजे गोवंश संवर्धन होय म्हणून गोमातेचे ऋण व्यक्त करण्यासाठी या सणाची निर्मिती झाली असावी असे मला वाटते.
म्हणून या दिवशी गाई वासराचे पूजन केले जाते.
2) गुरुद्वादशी/धन्वंतरी जयंती
शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025
ॐ वासुदेवाय विद्महे सुधाहस्ताय धीमहि।
तन्नो धन्वंतरिः प्रचोदयात्
उदय व्यापिनीअश्विन कृष्ण द्वादशीला गुरुद्वादशी असे म्हणतात. भगवान दत्तात्रयांचे अवतार श्रीपाद वल्लभ यांचा हा पुण्यतिथीचा दिवस आहे.
धनत्रयोदशी
प्रदोष काळी असलेल्या आश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी निमित्त घरातील सोने, अलंकार स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. या दिवशी सायंकाळी दिवा लावून त्याची ज्योत दक्षिणेकडे करावी आणि अपमृत्यू अर्थात अकालीमृत्यू येऊ नये यासाठी दिव्याला नमस्कार करून खालील मंत्राने प्रार्थना करावी.
यम प्रार्थना मंत्र
मृत्यूंना पाशदंडाभ्यां कालेन: श्याम यासह।
त्रयोश्यां दीपदानत् सूर्यज: प्रियतां मम॥
तसेच आयुर्वेदाचा प्रवर्तक भगवान धन्वंतरी यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते.
निरोगी दीर्घायुषी लाभावे म्हणून धन्वंतरी पूजन केले जाते.
धन्वंतरी मुहूर्त
सकाळी -06: 27 ते 10:51
दुपारी – 12: 18 ते 01:46
सायंकाळी – 4 : 41 ते 06:09
3) नरकचतुर्दशी
सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025
या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून हजारो स्त्रियांची बंदीवासातून सुटका केली. त्यावेळी नरकासुराने जी व्यक्ती या दिवशी पहाटे चंद्रोदय अभ्यंंग स्नान करेल त्यास नरकाची पीडा होऊ नये असा वर मागितला. त्यामुळे नरक चतुर्दशीला पहाटे चंद्रोदयी अभयस्नानाचे विशेष महत्त्व आहे. म्हणून नरक पिडा होऊ नये म्हणून पहाटे चंद्रोदयी अभ्यंग स्नान केले जाते.
🪔अभ्यंगस्नान –
पहाटे 05.20 वा
🪔यमतर्पण –
अपमृत्यू येऊ नये म्हणून यम तर्पण करावे.
वडील जिवंत असलेल्यांनी पाण्यात तांदूळ घालून व इतरांनी पाण्यात तीळ घालून खालील नावाने तर्पण करायला सांगितलेले आहे.
प्रथम संकल्प करून,यम प्रार्थना व यम तर्पण करावे.
🪔तर्पण संकल्प
मम नरकभय – निरसणार्थं यम प्रसाद – सिद्ध्यर्थं नरक – चतुर्दश्यां यम -तर्पण करिष्ये।
🪔प्रार्थना मंत्र
यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः।
भूताधिपोऽदत्त कृतानुसारि कृतांत एतत् दशभिर्जपंती॥
🪔तर्पण मंत्र
1)यमाय नमः यमं तर्पयामि।
2)धर्मराजाय नमः धर्मराजं तर्पयामि।
3)मृत्युंवे नमः मृत्युं तर्पयामि।
4)अन्तकाय नमः अन्तकम तर्पयामी।
5)वैवस्वते नमः वैवस्वतं तर्पयामि।
6)कालाय नमः कालं तर्पयामि।
7)सर्वभूतक्षयाय नमः सर्वभूत क्षयंकरं तर्पयामि।
8)औदुंबराय नमः औदुंबरं तर्पयामि।
9)दध्ने नमः दध्नं तर्पयामि।
10)नीलाय नमः नीलं तर्पयामि।
11)परमेष्ठिने नमः परमेष्ठिनं तर्पयामि ।
12)वृकोदराय नमः वृकोदरं तर्पयामि।
13)चित्राय नमः चित्रं तर्पयामि।
14)चित्रगुप्ताय नमः चित्रगुप्तं तर्पयामि ।
4 ) लक्ष्मीपूजन कुबेर मुहूर्त
मंगळवार दि .21 ऑक्टोबर 2025 (अश्विन कृष्ण -अमावस्या)
सायंकाळ पासून – प्रदोष काळापर्यंत अर्थात सूर्यास्तानंतर 02 तास 24 मिनिट, म्हणजे सायं. 6:07 ते 8 :34 या वेळेतच शक्यतो करावे.
ज्यांना वरील वेळ सोयीची नसेल त्यांच्या साठी तडजोड म्हणून अर्थात याला मुहूर्त म्हणता येत नाही. कारण शास्त्र सांगते प्रदोषकाळीच लक्ष्मी -कुबेरपूजन करणे शास्त्रसमत आहे.
दुपारी 03:12 ते 04:19
5) दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा
बुधवार दि. 22 ऑक्टोबर 2025 (कार्तिक शुक्ल -1)
अभ्यंगस्नान साडेतीन मुहूर्तातील एक दिवस,
वही आणि गोवर्धन पूजनाचा दिवस, आपल्या पतीला ओवाळून पतीकडून ओवाळणी घ्यायचा दिवस.
वहीपूजन मुहूर्त
सकाळी -06ः 29 ते दुपारी 12:17
ज्यांना वरील वेळ सोयीची नसेल त्यांच्या साठी खाली शुभ वेळ देत आहे.
दुपारी – O3:12 ते 06:06
6 ) यम द्वितीया, भाऊबीज
गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर 2025
अपराह्नकाळी असलेल्या द्वितीयाच्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते. बहिणीने भावाला ओवाळण्यासाठी विशेष मुहूर्ताची आवश्यकता नसते.
या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या घरी भोजनात गेले होते म्हणून या दिवसाला यम द्वितीया असे म्हटले जाते. या दिवशी बहिणीच्या हातचे भोजन करून तिचा सत्कार करावा. बहिण भावाचं प्रीतीच अतूट नातं वृद्धिंगत करण्याचा सण म्हणजे भाऊबीज.
या दिवशी सुद्धा आपण मृत्यू म्हणजे अकाली मृत्यू येऊ नये म्हणून यमतर्पन करावे असे शास्त्र आहे.
यमतर्पनाची माहिती नरक चतुर्दशी दिवशी दिले आहे.
7) पांडव पंचमी (कडपंचमी )
बुधवार दि. 26 ऑक्टोबर 2025
पांडव पंचमीच्या सणाने दीपावलीच्या सणाची सांगता होते.
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तुसल्लागार आहेत)
![]()
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री, वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.











































































