Last Updated on 07 Oct 2024 4:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । दि इथेनॉल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेच्या उपाध्यक्षपदी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतीक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अकलूज येथे राज्याचे माजी उप मुख्यमंत्री,संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. विजयसिंह मोहिते- पाटील,संस्थेचे कार्याध्यक्ष आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या वार्षिक सभेत प्रथम माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, स्वरूप दिलीपराव देशमुख, विवेक बिपीनदादा कोल्हे, संजीव आर.देसाई, तसेच सांगली जिल्ह्यातून प्रतीक पाटील, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड, संग्रामसिंह देशमुख आदी १४ संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर रणजितसिंह मोहिते-पाटील यांची कार्याध्यक्ष, तर प्रतीक पाटील, विकास रामचंद्र रासकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आर.जी.माने हे या राष्ट्रीय संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत.

‘जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील व संस्थेच्या संचालक मंडळाने माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे,त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत इथेनॉल क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन,’ अशा विश्वास प्रतीक पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक बबनराव थोटे,शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीप कुमार पाटील, संचालक प्रताप पाटील, रघुनाथ पाटील, रमेश हाके,शैलेश पाटील, सौ.मेघा पाटील, प्रा.डॉ.योजना शिंदे-पाटील, राजकुमार कांबळे, कार्यकारी संचालक आर. डी.माहुली प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा – ‘राजारामबापू’ येत्या ११ ऑक्टोबरला जमा करणार ठेवींवरील व्याजाचे ३ कोटी ४४ लाख रुपये










































































