Last Updated on 10 Aug 2023 2:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आज जागतिक सिंह दिन आहे. सिंह प्रजातीच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी दरवर्षी 10 ऑगस्टला सिंह दिन साजरा केला जातो. सिंहांचे संवर्धन आणि संरक्षणाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जगभरात दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी हा दिवस पाळला जातो. आशियाई सिंहांचा नैसर्गिक अधिवास असलेल्या गुजरातच्या गीर अभयारण्यात यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. साततत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 2020 पर्यंत तिथे आशियाई सिंहांची संख्या 674 झाली आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सिंह दिनानिमित्त दिलेल्या संदेशात या प्रयत्नांचं कौतुक केले आहे.
जागतिक सिंह दिनानिमित्त, सिंहांच्या अधिवासाचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त सिंहांच्या अधिवासाचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांच्या समर्पणाचे कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले :
“जागतिक सिंह दिन हा भव्य पराक्रमी सिंहांचा उत्सव साजरा करण्याचा एक प्रसंग आहे. सिंह आपल्या सामर्थ्याने आणि भव्यतेने आपल्या सर्वांचे हृदय मोहित करतात. आशियाई सिंहांचा रहिवास असल्याचा भारताला अभिमान आहे आणि गेल्या काही वर्षांपासून भारतात सिंहांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सिंहांच्या अधिवासाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या सर्वांचे मी कौतुक करतो. पुढील पिढ्यांसाठी, सिंहाच्या संख्येत भर पडत राहील असे आपण त्यांचे पालनपोषण आणि संरक्षण करत राहू या.”











































































