Last Updated on 11 Oct 2023 10:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । जुन्या सुप्रसिध्द नाटकांची पुनर्निर्मिती करुन त्या नाटकांचे चित्रीकरण करुन जतन करण्यास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मान्यता दिली आहे.
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत विविध नाविण्यपूर्ण कार्यक्रमांचे/उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.कला व साहित्य क्षेत्रामध्ये भरघोस योगदान दिलेल्या व्यक्ती यांचा गौरव व्हावा,तसेच त्या कलाकृती/व्यक्ती/महत्वपूर्ण औचित्य याबाबत नवीन पिढीला माहिती व्हावी म्हणून व त्या माहितीद्वारे नवीन पिढीच्या ज्ञानात भर पडावी,या उद्देशाने अशा व्यक्ती/कलाकृतीचे हीरक,अमृत,शताब्दी या औचित्याने महोत्सव आयोजित करण्यात येतात.
त्याच धर्तीवर जुन्या नाटकांची पुनर्निर्मीती करुन त्या नाटकांचे चित्रिकरण करुन जतन करण्याच्या उपक्रमास वित्तीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
जुन्या नाटकांची पुनर्निर्मीती करुन त्या नाटकांचे चित्रिकरण करून जतन करण्याच्या उपक्रमावर होणारा अठ्ठावीस लाख ऐंशी हजार रुपये एवढया रक्कमेस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.










































































