Last Updated on 11 Nov 2024 8:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । महाराष्ट्रात महायुतीला १६५ हून जास्त जागा मिळतील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला आहे. सांगली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी तावडे सांगलीत आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जातीनिहाय जनगणनेच्या आडून राहुल गांधी यांना मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून द्यायचा डाव आहे, असा आरोप विनोद तावडे यांनी केला.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने जनतेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विकासाचा लाभ मिळवून दिला आहे असा दावाही विनोद तावडे यांनी यावेळी केला. सांगली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपाचे नेते शेखर इनामदार यांच्यासहित पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.












































































