Last Updated on 18 Feb 2022 11:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
जलसंपदा मंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे बुधवार दि.२३ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता १८ वर्षाखालील लहान मुला-मुलींचा मोफत आरोग्य तपासण्या व उपचार तसेच शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केलेले आहे.
उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर, राजारामबापू सहकारी साखर कारखाना व मुबई येथील एसआरसीसी हॉस्पिटलच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ना.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित शिबिराची वेळ बुधवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत अशी आहे. या शिबिरात जिल्ह्यातील १८ वर्षा खालील लहान मुला-मुलींचे ह्रदय, मेंदू, अस्थि व जनरल सर्जरी आदी चार तपासण्या केल्या जाणार आहेत. यातून आवश्यक असणाऱ्या लहान मुला-मुलींच्या शस्त्रक्रिया व उपचार मुंबई येथील सुपर स्पेशालिटी एसआरसीसी हॉस्पिटलमध्ये मोफत केल्या जाणार आहेत. या शिबिराचा जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी केले आहे.
शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालया चे अधिक्षक डॉ.नरसिंह देशमुख,राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश म्हाळुंगकर व त्यांचे सहकारी करीत आहेत. अधिक माहितीसाठी डॉ.प्रकाश म्हाळुंगकर (मो.नं.9970900 700) यांच्या संपर्क करावा.












































































